गेवराईतील पत्रकारांचे मधुरबन बर्थडे पॉईंटवर स्नेहमिलन
दिनकर शिंदे यांचा संपादक व पत्रकारांकडून हृदयसत्कार

0
82

गेवराई ( प्रतिनिधी ) गेवराई तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यासोबतच शेतकरी, कष्टकरी, नौकरदार, व्यापारी, युवक-युवती यांच्या हितासाठी सातत्याने लिखाण करणाऱ्या गेवराई शहरातील सर्व पत्रकारांचा पहिल्यांदाच मधुरबन बर्थडे पॉईंट, गेवराई या निसर्गरम्य ठिकाणी स्नेहमिलन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सर्व उपस्थित पत्रकार बांधवांनी अ भा मराठी पत्रकार परिषदेशी सलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी दिनकर शिंदे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन हृदयसत्कार केला.
गेवराई तालुक्यात वेगवेगळ्या मुद्द्यांवर चळवळी आणि आंदोलन होत असतात. समाजहितासाठी झगडणाऱ्या प्रत्येकाची दखल घेऊन, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शहरासह तालुक्यातील अनेक पत्रकार प्रामाणिकपणे काम करत आहेत. यात प्रिंट मीडियासह आता डिजिटल मीडियाचेही मोठे जाळे निर्माण झाले आहे. प्रत्येक घटना समाजासमोर आणण्याचा प्रयत्न येथील पत्रकार बांधव सातत्याने करत आहेत. आपल्या धावपळीच्या जीवनात केव्हातरी निवांत एकत्र येऊन एकमेकांशी सुसंवाद साधावा या उद्देशाने येथील कलाविष्कार प्रतिष्ठानचे कार्यवाहक तथा पत्रकार दिनकर शिंदे यांनी सर्व पत्रकार बांधवांसाठी, मधुरबन बर्थडे पॉईंट या निसर्गरम्य ठिकाणी स्नेहमिलन व स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सर्व पत्रकारांनी उपस्थिती लावून, वेगवेगळ्या विषयावर मनमोकळ्या गप्पा मारल्या, चर्चा केली. याप्रसंगी डिजिटल मीडिया परिषदेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी दिनकर शिंदे यांची निवड झाल्याबद्दल सर्व पत्रकारांनी त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन हृदयसत्कार केला.
यावेळी डिजिटल मीडिया प्रदेश उपाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी पत्रकारांसमोरच्या अडचणी आणि काम करण्याच्या संधी याबाबत मार्गदर्शन केले. गेवराई तालुक्यातील पत्रकारांची समाजाप्रती असलेली तळमळ आणि एकोपा पाहून अभिमान वाटतो. यापुढेही सर्वांनी असेच एकसंघ रहावे असे म्हटले. ज्येष्ठ पत्रकार काझी अमान, सुभाष मुळे यांनी पत्रकार दिनकर शिंदे हे सर्वांसोबत मिळून मिसळून राहतात, वेगवेगळ्या क्षेत्रात ते सक्रिय काम करतात. त्यासोबतच बातमीच्या बाबतीत ते सतत अपडेट असतात याचे कौतुक वाटते असे ते म्हटले. प्रदीप जोशी यांनी कविता सादर केली. यानंतर सर्वांनी एकत्रित स्नेहभोजन केले.
या स्नेहमिलन कार्यक्रमास डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र शिरसाठ, जिल्हा कार्याध्यक्ष दिनकर शिंदे, ज्येष्ठ पत्रकार काझी अमान, सुभाष शिंदे, सुभाष मुळे, डिजिटल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष प्रतीक कांबळे, म रा मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अंकुश आतकरे, महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब हुंबरे, डिजिटल मीडिया परिषद तालुकाध्यक्ष अविनाश इंगवले, दक्ष पत्रकार संघ अध्यक्ष विनोद नरसाळे, वाईस ऑफ मीडियाचे अध्यक्ष विनोद पौळ, प्रा सुनील मुंडे, संपादक सुनील पोपळे, संपादक अमोल वैद्य, वैजीनाथ जाधव, सोमनाथ मोटे, शेख जावेद, प्रदीप जोशी, अमोल कापसे, शिवनाथ काळे, शेख हारूनभाई, सिद्धार्थ मोरे, चंद्रकांत नवपुते, अनिल अलगुडे, श्याम जाधव आदींसह विविध वर्तमानपत्राचे प्रतिनिधी, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि डिजिटल मीडियाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here