आजच्या काळातही महिला असुरक्षित – डॉ कांचन परळीकर

0
71

महिला महाविद्यालयात महिलादिनी परिसंवाद संपन्न


गेवराई, दि. ९ (प्रतिनिधी) –
प्रत्येक क्षेत्रात स्त्रीयांनी आपले दैदिप्यमान कर्तृत्व सिद्ध केले असतांनाही आजच्या काळातही महिला असुरक्षितच आहेत, असे प्रतिपादन येथील महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. कांचन परळीकर यांनी केले.
जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या महिला महाविद्यालयाच्या ‘अंतर्गत तक्रार निवारण समिती’ च्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न’ या विषयावर आयोजत परिसंवादामध्ये प्राचार्य डॉ. कांचन परळीकर बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून शारदा विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका श्रीमती रोहिणी लाखोटे यांची उपस्थित होती.
पुढे बोलतांना प्राचार्य डॉ. कांचन परळीकर म्हणाल्या की, पुरुषांचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला नाही. ‘जेंडर’ मानसिकता बदलल्याशिवाय खऱ्या अर्थाने महिला दिन साजरे होणार नाहीत.
याप्रसंगी श्रीमती रोहिणी लाखोटे म्हणाल्या की, आजच्या स्त्रीयांना कर्तृत्वासोबतच स्वसुरक्षा सांभाळणे गरजेचे आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक या समितीच्या प्रमुख प्रा. डॉ. संगीता आहेर यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. तबस्सुम इनामदार यांनी केले . कार्यक्रमाचे आभार प्रा. डॉ. कल्पना घारगे यांनी मानले. या परिसंवादासाठी महाविद्यालयातील अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या सर्व सदस्या व शारदा विद्या मंदिरच्या शिक्षिकांनीही सहभाग नोंदविला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here