गेवराई :
शहरातील जायकवाडी वसाहत येथील रूद्रेश्वर सेवा मंडळाच्या वतीने श्री संत तुकाराम महाराज बीज निमित्त रूद्रेश्वर महादेव मंदिरात गुरूवार रोजी सकाळी राजेंद्र महाराज वाघमारे यांचे किर्तन व कोरोना काळात डाॅक्टर तसेच पत्रकारांनी केलेल्या कामा बद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.यावेळी अनेक जण उपस्थित होते.
गुरूवार रोजी श्री संत तुकाराम महाराज बीज निमित्त शहरातील जायकवाडी वसाहत येथील रूद्रेश्वर सेवा मंडळाच्या वतीने येथील महादेव मंदिरात सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले.त्यानंतर सकाळी १० वाजता रामायणाचार्य राजेंद्र महाराज वाघमारे यांचे किर्तन झाले. या नंतर कोरोना काळात आपल्या जिवाची पर्वा न करता नागरीकांची सेवा करणा-या येथील पत्रकार मधुकर तौर,शिवाजी ढाकणे, सखाराम शिंदे,सुनिल मुंडे,विनोद पौळ,भागवत जाधव,अमोल वैद्य,विनोद नरसाळे,दत्ता लाड तसेच डाॅक्टर अनिल दाभाडे, प्रविण सराफ,मुरलीधर मोटे, मनोज मडकर तसेच समाज भुषण पुरस्कार मिळालेले बाबुसेठ झवर सह विविध जणाचा गौरव करण्यात आला.या नंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला.यावेळी असंख्य भावीक भक्त तसेच रूद्रेश्वर सेवा मंडळ जायकवाडी वसाहत गेवराई येथील सर्व जण मोठ्या संख्येने उपस्थित होते.