राष्ट्रीय जनसेवा पक्षाच्या महिला आघाडीचा अभिनव उपक्रम
प्रतिनिधी : संजय पंडित
दि.९ कात्रज (पुणे) : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय जनसेवा पक्ष महिला आघाडी आणि सहयोग फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कात्रज येथे महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते.राष्ट्रीय जनसेवा पक्षाच्या प्रदेश महिला उपाध्यक्षा वनिता ताई भालेकर आणि पिंपरी चिंचवड विभाग महिला अध्यक्षा विनयाताई संबेटला,संघटक बेबीताई कऱ्हेकर यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वैशालीताई चौधरी,कान्होपात्रा पंडित यांनी देखील हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमास प्रमुख सत्कारमूर्ती म्हणून नाभिक समाजातील धाडसी कन्या अपेक्षा शेटे उपस्थित होती तर प्रमुख पाहुण्या आणि सन्मान मूर्ती म्हणून राज्यभरात ज्यांच्या धाडसाचे कौतुक झाले अशी रणरागिणी तृप्तीताई देसाई उपस्थित होत्या.
या संपूर्ण सन्मान सोहळ्याचे कुशल नियोजन कात्रज येथील सहयोग फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले होते.
कार्यक्रमात विविध कार्यक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर महिलांचा सन्मान करून शाल,श्रीफळ आणि ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला.यामधे प्रामुख्याने जेष्ठ लेखिका पुष्पा भंटार,ऍडव्होकेट पुनमताई राऊत तसेच पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरातील नामवंत महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी रणरागिणी तृप्ती देसाई यांनी महिलांना मार्गदर्शन करताना महिलांनी प्रत्येक क्षेत्रात धाडसाने पुढे येण्याचे आवाहन केले. पुणे जिल्हाध्यक्ष भगवानराव शिंदे यांनीही यावेळी महिलांच्या सन्मानार्थ प्रबोधन केले.कार्यक्रमाच्या शेवटी डॉ.अरविंद झेंडे आणि अरुण कालेकर यांनी उपस्थित महिलांचे आणि आयोजन करणाऱ्या विनयाताई संबेटला तथा वनिताताई भालेकर यांचे विशेष आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.