*
मानवत / प्रतिनिधी.
मानवत मार्केट यार्ड सहकारी खरेदी विक्री संघाचा वतीने दिनांक २८ फेब्रुवारी रोजी पासून नोंदणी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. हरभरा हमी भाव ५ हजार ३३५ रुपये प्रति क्वीटल खरेदी करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी नोंदणी करण्यासाठी ७ /१२ उतारा ऑनलाईन पिक पेरा सण २२- २३ रब्बी हरभरा सहित, होल्डिंग प्रमाणपत्र, आधार कार्ड प्रत,आधार लिंक पासबुक प्रत, अद्यावत मोबाईल क्रमांक इत्यादी आवश्यक कागदपत्रे घेऊन मानवत येथील मार्केट यार्ड परिसरातील मानवत सहकारी खरेदी विक्री संघ कार्यालय या ठिकाणी नोंदणी करावी असे आवाहन दि मानवत सहकारी खरेदी विक्री संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
**