मानवत / प्रतिनिधी.
मानवत तालुक्यातील मौ. वझुर खु. येथील शेतकऱ्यांनी कॅनॉलला पाणी सोडण्यात यावे अशी मागणी २३ फेब्रुवारी रोजी कार्यकारी उपविभागीय अधिकारी पाटबंधारे विभाग पाथरी यांच्या कडे केली होती. वझुर खु. येथील कॅनॉलचे पाणी चारी क्रं B- ५९ या चारीत पाणी रोटेशन प्रमाणे सोडण्यात यावे या मागणी साठी वेळोवेळी अर्ज करण्यात आले परंतु संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होत होते. परंतु येथील शेतकऱ्यांनी उपोषणाचा इशारा देताच संबंधित विभागाचे अधिकारी खडबडून जागे होत अधिकारी २५ फेब्रुवारी रोजी गावात आले व या बाबत सविस्तर चर्चा करुन कॅनॉलचे पाणी सोडू असे आश्वसन दिले त्यानंतर २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ०६ वाजता चारी क्रं B-५९ मध्ये पाणी सोडण्यात आले. यामुळे शेतकऱ्यामध्ये एक समाधान व्यक्त होत आहे.
**