नागराज मंजुळे यांना हंबर्डे साहित्य पुरस्कार जाहीर

0
132

नागराज मंजुळे यांना हंबर्डे साहित्य पुरस्कार जाहीर

आष्टी प्रतिनिधी
आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,एडवोकेट बी.डी.हंबर्डे महाविद्यालय आणि भाऊ फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने संस्थापक अध्यक्ष बन्सीधरराव धोंडीबापू हंबर्डे यांच्या स्मृती प्रित्यर्थ राज्यस्तरीय उत्कृष्ट मराठी साहित्य पुरस्कार,मराठी चित्रपट दिग्दर्शक,निर्माता,उन्हाच्या कटाविरुद्ध या अनेक पुरस्काराने गौरविलेल्या कविता संग्रहाचे कवी नागराज मंजुळे यांना जाहीर झाला आहे.असे भाऊ फाउंडेशनचे कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितले.कुसुमाग्रज जन्मदिन, मराठी भाषा दिवस याचे औचित्य साधून हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दि.18 ऑगस्ट रोजी भाऊंचा स्मृतिदिन आहे.रोख रक्कम,सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे, सचिव अतुल शेठ मेहेर,सर्व संचालक मंडळ,प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.असे ही भाऊ फाउंडेशनचे प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांनी सांगितले.नागराज मंजुळे यांचे मराठी चित्रपट सृष्टीतील योगदान सर्वश्रुत आहे.त्यांचा पिस्तुल्या हा लघुपट खूप गाजला.त्यानंतर फॅन्ड्री हा वेगळ्या विषयावरील चित्रपटही रसिक श्रोत्यांच्या लक्षात राहिला.सैराट या चित्रपटाने तर इतिहास घडवला.नाळ हा चित्रपटही बालमनाच्या भावनेला हात घालून गेला.झुंड या चित्रपटाच्या माध्यमातून प्रसिद्धअभिनेता अमिताभ बच्चन यांना सोबत घेऊन त्यांनी हिंदी मध्ये दमदार पदार्पण केले.त्यातही ते यशस्वी झाले.त्यांचा कवितासंग्रह उन्हाच्या कटाविरुद्ध या कविता संग्रहातील कविता सामाजिक आशयाचं भान प्रतिबिंबित करते.मराठी,हिंदी चित्रपटातील त्यांच्या जबरदस्त दबदब्यामुळे त्यांच्यातला कवी झाकोळला जातो.उन्हाच्या कटाविरुद्ध कवितासंग्रह वाचल्यानंतर कवी अधिक गडद होऊ लागतो.हंबर्डे महाविद्यालय आणि भाऊ फाउंडेशनच्या वतीने या अगोदर प्रभाकर साळेगावकर,श्रीराम गिरी,सोपान हाळमकर,संजय बोरुडे,दासू वैद्य या साहित्यिक,कवींना हा हंबर्डे साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here