गेवराई (प्रतिनिधी) कै. चि. ओमकार प्रतिष्ठान राहेरी संचलित इरा मॉडेल इंटरनॅशनल स्कूल व जुनिअर कॉलेज तलवाडा च्या प्राचार्या मोरे मनीषा यांनी महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय यांचे जावक क्रमांक आर टी ई 25%/2025/801/108 दिनांक 13/01/2025 परिपत्रकानुसार 2025-2026 या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल घटक व वंचित घटकाकरिता 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला दिनांक 14 /1/2025 ते 27/01/2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तरी पालकांनी आपल्या पाल्यांची ऑनलाइन अर्ज 25% मोफत प्रवेशासाठी सदरील कालावधीमध्ये ऑनलाईन भरावीत. 25 टक्के मोफत प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज पालकांनी प्रवेश अर्ज भरावेत ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्र उदाहरणार्थ दुर्बल घटकातील पालकांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र. जन्म प्रमाणपत्र. रहिवासी प्रमाणपत्र. मुलाचे किंवा मुलीचे आधार कार्ड असल्यास आधार कार्ड. वंचित घटकातील मुलासाठी वडिलांचे जात प्रमाणपत्र. मुलाचे किंवा मुलीचे जन्म प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र. दिव्यांग मुलासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र जिल्हा शल्य चिकित्सक यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र 40% इत्यादी कागदपत्र आवश्यक आहेत. तरी 25% मोफत प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता काही अडचण आल्यास कै. ची ओमकार प्रतिष्ठान राहेरी संचलित हिरा मॉडेल इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज तलवाडा च्या प्राचार्य मोरे मनीषा यांच्याशी संपर्क ९०४९१०५००३/९५६१३२४०१३/९०११४२०७६७ या नंबर वर संपर्क करावा किंवा प्रत्यक्षात शाळेच्या वेळेत सकाळी नऊ ते तीन पर्यंत प्रत्यक्षात अडचण विचारू शकतात तरी 25% मोफत प्रवेशाचा फायदा घेण्यासाठी सर्व पालकांनी ऑनलाइन अर्ज दिलेल्या मुदतीच्या आत भरावा. असे प्राचार्य मोरे मनीषा यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार कळविण्यात आले आहे