खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड यांना केज न्यायालयाची 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी; मात्र मकोका लावून हत्येचा कट रचल्या प्रकरणी एस आय टी ने घेतले ताब्यात.

0
23

” परळी मध्ये वाल्मीक कराडचे समर्थक आक्रमक, टॉवरवर चढले, टायर पेटवले.

बीड!प्रतिनिधी

खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांची 15 दिवसाची पोलीस कोठडी संपल्या नंतर आज पुन्हा त्यांना केज न्यायालयात हजर केल्या नंतर न्यायालयाने त्यांना 24 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान वाल्मिक कराड यांच्यावर मकोका लावण्यात आला असून एस आय टी ने हत्येचा कट रचल्याचा आरोप करत त्यांना मकोका कोर्टात नेले आहे.

वाल्मिक कराड यांच्या नावावर पवनचक्की प्रकरणातल्या खंडणी आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंद आहे. त्याचवेळी त्यांच्यावर देशमुख हत्या प्रकरणाचेही थेट आरोप होत आहेत. या सगळ्याचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे असल्याने पथक कराड यांच्या मागावर होते. अखेर वाल्मिक कराड 15 दिवसा पूर्वी अतिशय नाट्यमयरित्या गुन्हे अन्वेषण विभागाला शरण आले.

त्या नंतर त्यांना केज येथील न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी झालेल्या सुनावणी नंतर न्यायालयाने त्यांना 15 दिवसाची सी आय डी कोठडी सुनावली आज ही 15 दिवसाची सी आय डी कोठडी संपत असल्याने कराड यांना पुन्हा केज न्यायालयात हजर करण्यात आले या वेळी कराड यांच्या वतीने ॲड ठोंबरे तर विशेष सरकारी वकील म्हणून ॲड जे बी शिंदे यांनी काम पाहिले.

वाल्मिक कराड यांच्यावर मकोका व हत्येचा कट रचल्याचा आरोप असल्यामुळे या
दरम्यान वाल्मिक कराड यांना मकोका लावण्यात आला असून कराड यांच्यावर एस आय टी ने हत्येचा कट रचल्याचा आरोप करून ताब्यात घेत त्यांना मकोका कोर्टात नेले आहे.

वाल्मीक कराडचे समर्थक आक्रमक, टॉवरवर चढले, टायर पेटवले.

परळीमध्ये वाल्मीक कराड यांच्या समर्थकांमुळे तणावाचे वातावरण निर्माण झालेय. वाल्मीक कराड याच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप करत समर्थक आक्रमक झाले.

वाल्मीक कराड यांच्या आईने आज सकाळपासून परळी स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलन केले होते. त्यानंतर परळीमध्ये कराड समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेत टॉवरवर चढून आंदोलन केले. एकीकडे वाल्मीक कराडला घेऊन सीआयडी न्यायालयात घेऊन गेली असतानाच दुसरीकडे परळीमध्ये नागरिकांकडून आंदोलन करण्यात येत आहे.

परळीमध्ये कराड समर्थकांनी टॉवरवर चढत आंदोलन केले. आक्रमक झालेल्या समर्थकांनी टायरही पेटवले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत टायर विझवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here