बीडमध्ये मतदान केंद्रावरच अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

0
1411

बीड : बाळासाहेब शिंदे हे बीड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत होते. यादरम्यान ते बीड शहरातील छत्रपती शाहू विद्यालयात असणाऱ्या मतदान केंद्रावर थांबले होते. यादरम्यान त्यांना चक्कर आली अन् खाली पडले. त्यानंतर त्यांना बीड शहरातील काकू नाना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.. तिथून त्यांना छत्रपती संभाजी नगर येथील रुग्णालयात देखील दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केलंय. दरम्यान या दुर्दैवी घटनेने बीड शहरासह जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here