वेल्डिंग करताना 15 वर्षे जुनी टाकी फुटली;मक्याखाली दबून चार ठार

0
340

छत्रपती संभाजीनगर –

शेेंद्रा एमआयडीसीमध्ये मद्यनिर्मिती करणाऱ्या रॅडिको डिस्टिलरी कंपनीत पंधरा वर्षे जुनी टाकी वेल्डिंग करतान फुटली. या दुर्घटनेत ३.५ लाख किलो मक्याच्या ढिगाऱ्याखाली दबून चार मजुरांचा मृत्यू झाला, तर चार मजूर जखमी आहेत. दरम्यान, मृतांच्या नातेवाइकांनी नुकसान भरपाई मिळेपर्यंत मृतदेह उचलण्यास नकार दिला. या दुर्घटनेनंतर छावा आणि मराठा संघटनांनी कंपनीत तोडफोड केली.
मद्यनिर्मितीसाठी मका साठवण्यात आलेली टाकी (सायलो) खालून फुटल्यामुळे दोन दिवसांपासून त्यातून मक्याची गळती होत होती. शुक्रवारी सकाळी दहा वाजता या टाकीचे वेल्डिंगचे काम सुरू करण्यात आले होते. ५० फूट उंचीच्या टाकीला ३० फुटांच्या उंचीवर वेल्डिंग करण्यात येत होते. अचानक दुपारी अडीच वाजता मोठा स्फोटासारखा आवाज होऊन ही टाकी कोसळली. मक्याच्या दाणांचा ढीग दूरपर्यंत उधळला. त्या वेळी काम करणारे मजूर ढिगाऱ्याखाली दबले गेले. ही दुर्घटना एवढी भीषण होती की लाखो क्विंटल मक्यासह हजारो किलो वजनाचे पत्रेही मजुरांच्या अंगावर पडले. सहा जेसीबी आणि ३ क्रेनने सात तास ढिगारा हटवण्याचे काम सुरू होते.

जखमींवर उपचार सुरू

वाल्मीक पांडुंरंग शेळके (३८, कुंभेफळ), प्रशांत मधुकर काकड(३६, सिडको), संदीप ज्ञानेश्वर घोडगे (४७, शेंद्रा), प्रशांत सोनवणे (२९, पाचोरा)आम्ही गाडीत अडकलो होतो, आम्हाला अर्ध्या तासाने बाहेर काढले रात्री नऊ वाजता गाडी घेऊन आलो होतो. सकाळी १० वाजेपासून ट्रक रिकामा करणे सुरू होते. अर्धी गाडी खाली केली, मात्र काही मेंटेनन्सचे काम सुरू असल्याने दुपारपर्यंत गाडी रिकामी झाली नाही. दुपारी अडीच वाजता अचानक टाकी कोसळली, मी गाडीतच होतो. गाडीचे आठ लाखांचे नुकसान झाले आहे. मी आणि सुपरवायझर गाडीसह अडकलो होतो. आम्हाला अर्ध्या तासाने बाहेर काढले. आपण जिवंत राहिलो याचेच आश्चर्य वाटते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here