लाडक्या बहि‍णींच्या उपस्थितीत विजयसिंह पंडित यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0
423

गेवराई (प्रतिनिधी) बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह शिवाजीराव पंडित यांनी गेवराई विधानसभा मतदार संघातून लाडक्या बहि‍णींच्या प्रमुख उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कोणताही बडेजावपणा न करता त्यांनी अतिशय सध्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अर्ज दाखल केला आहे. लाडक्या बहि‍णींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्यामुळे आपला विजय निश्चित असल्याची प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे. यावेळी उपस्थित मतदार, कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी विजयसिंह पंडित यांना शुभेच्छा दिल्या.

गेवराई विधानसभा मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार विजयसिंह शिवाजीराव पंडित यांनी आपला उमेदवारी अर्ज गुरुवार दि.२४ ऑक्टोबर रोजी गुरु पुष्यामृत मुहूर्तावर लाडक्या बहि‍णींच्या उपस्थितीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी सतीश धुमाळ यांच्याकडे दाखल केला. यावेळी लाडक्या भगिनींच्या प्रतिनिधी म्हणून सौ. वैशालीताई कांडेकर, सौ. मीनाताई पिसाळ, तनुजाताई पठाण आणि सौ. विजयमाला राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवछत्र निवास्थानी

माजी मंत्री शिवाजीराव दादा पंडित यांचे आशिर्वाद घेऊन विजयसिंह पंडित यांनी सकाळी नामलगाव येथील आशापुरक गणपती, पेंडगाव येथील जागृत देवस्थान मारोतीराया, शिवाजीनगर गढी येथील जय भवानी देवी आणि तलवाडा येथील त्वरिता देवीचे दर्शन घेतले, गेवराई शहरातील हजरत गैबी साहेब दर्ग्यावर चादर चढवून आशिर्वाद घेतले.

बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी अतिशय सध्या पद्धतीने लाडक्या बहिणींना सोबत घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. गेवराई विधानसभा मतदार संघातील मतदारांनी या साधेपणाचे स्वागत केले. महिलांना सन्मानाची वागणूक देत प्रातिनिधिक स्वरूपात लाडक्या बहिणीचा सन्मान केला असल्याची चर्चा गेवराई शहरात आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना मतदार, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here