वडवणी(प्रतिनिधी)-
वडवणी येथील महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे कर्तव्यदक्ष व सर्व परिचित नेतृत्व परमेश्वर राऊत यांची कन्या कु.पूजा परमेश्वर राऊत हिची स्टेनोग्राफर कोर्टात नुकतीच निवड झाली.
तिने स्टेनोग्राफर म्हणून बीड जिल्ह्यातील ता.केज न्यायालयात पदस्थापना दिनांक ५ आक्टोबर २०२४ रोजी संपन्न झाली.या प्रित्यर्थ पूजा राऊतचे स्वागत तिच्या पिताजी सोबत करण्यात आले.
स्वागत करताना प्राचार्य राऊत डी.डी.व श्री डोईफोडे आर.एस. सोबत दिसत आहेत.
पूजा तुझे अभिनंदन …! पूजा राऊत ही महाराणी ताराबाई विद्यालयाची माजी विद्यार्थीनी आसुन शालेय जिवनापासुनच ही ज्ञान साधनेच्या सतत शोधात आसनारी कन्या तिच्या या गुणग्राहकतेमुळे
खडतर व कठिण परीश्रमामुळे हे यश प्राप्त झाले. पूजाने मीळवलेले हे यश ग्रामीण भागातिल विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरेल अशी प्रतिक्रिया राऊत डी.डी.व श्री डोईफोडे सर यांनी व्यक्त केली.