शेतकरी, उसतोड व इतर असंघटित महीला कामगार मंचाची स्थापना मनिषा तोकले यांची राज्य अध्यक्ष म्हणून निवड

0
133

शेतकरी, उसतोड व इतर असंघटित महीला कामगार मंचाची स्थापना. “मनिषा तोकले यांची राज्य अध्यक्ष म्हणून निवड”
बीड:- शेतकरी म्हणून आज पर्यंत केवळ पुरुष शेतकरीच गृहीत धरला जात होता. शेतीमधील महिलांचे किम आणि ज्ञान असुनही महीलांना शेतकरी म्हणून ओळख मिळत नाही. शेतकरी शेतमजूर, ऊसतोड कामगार, अशा असंघटित क्षेत्रातील महीला शासकीय धोरणाचा भाग बनत नाहीत. त्या कायम वंचित राहतात.
महीला शेतकर्यांना शेतकरी म्हणून ओळख नसणे, जमिनीवरचा हक्क मिळविताना अडचणी येणे., कामाच्या ठिकाणी सुविधा न भेटणे, असे अनेक प्रश्न महीला शेतकर्यांचे आहेत. त्या प्रश्नाकडे सोयीस्कर पणे दुर्लक्ष केले जात आहे. अशा प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी तसेच नविन पर्याय शोधण्यासाठी शेतकरी, उसतोड व इतर असंघटित महीला कामगार मंचाची 5 सप्टेंबर रोजी स्थापना करण्यात आली. या साठी महीला किसान अधिकार मंच( मकाम) ने पुढाकार घेऊन राज्य व्यापी बैठक एस एम जोशी फौडेशन, पुणे येथे आयोजित केली होती. या वेळी मंचाची राज्य कार्यकारीणीची सर्व सहमतीने निवड करण्यात करण्यात आली.
यावेळी मकामच्या सदस्य सिमा कुलकर्णी, जेष्ठ समाजवादी नेते सुभाष वारे, मोलकरीण संघटनेच्या मेधा थत्ते, संघर्ष वाहिनीचे दीनानाथ वाघमारे, कागद काच पत्रा कष्टकरी संघटनेच्या सुरेखा गाडे, व शुभदा देशमुख, शेतकरी नेत्या कुमारी बाई जम कातन, सरिता मेश्राम, माधुरी खडसे, जोती थोरात रीना राऊत उपस्थित होत्या.
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण, आणि पश्चिम महाराष्ट्र अशा विविध विभागातून जवळपास १०० शेतकरी महीला उसतोड, मासेमारी व जंगलात काम करणाऱ्या महीला प्रतिनिधींनी बैठकीत आपले प्रश्न मांडले.
दोन दिवस सुरु असलेल्या या बैठकीत शेतकरी, उसतोड व इतर असंघटित महीला कामगार मंचाची थापना झाली. व महाराष्ट्र राज्याची कार्यकारीणी जाहीर करण्यात आली.
अध्यक्ष मनिषा तोकले , उपाध्यक्ष वैशाली पाटील, छाया पडघम, रंजना कान्हेरे, सरिता मेश्राम, शर्मिला केदार, मिधुरी खडसे, सचिव क्रांती खळगे, भटी पाडवी, प्रमिला पादीर कलावती संवंडकर ‌, सुनिता आलोने आशा कर्रेवार, खजिनदार स्वाती सातपुते, सह खजिनदार शालिनी वानखेडे,
सदस्य ज्योती थोरात, रेखा हाते, पल्लवी साळवे, रविना माने, कविता मौजे, छाया खरकाटे, शारदा रोकडे,
मानसेवी सदस्य सिमा कुलकर्णी, शुभदा देशमुख यांची निवड करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here