बीड (प्रतिनिधी)- तालुक्यातील आहेर लिंबगाव येथील एका तरुण अल्पभूधारक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. रवींद्र दिलीप धुमाळ (वय 21 वर्ष) असे त्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.
बीड तालुक्यातील आहेर लिंबगाव येथील रवींद्र दिलीप धुमाळ यांना वडिलोपार्जित दोन एकर जमीन आहे. ते आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह शेती व मजुरी करून करत होते. परंतु सततच्या नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून या तरुण शेतकऱ्याने
मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी आपल्या राहत्या घरी दुपारी 03 वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मयत तरुणाचे प्रेत खाली घेऊन बीड रुग्णालयात दाखल केले. जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
या मयत तरुण शेतकऱ्याच्या पश्चात वडील दिलीप तुकाराम धुमाळ आणि वयोवृद्ध आजी जिजाबाई तुकाराम धुमाळ
आहेत.