आष्टी प्रतिनिधी
सय्यद गुरुजी साहित्य अकादमीच्या वतीने यावर्षीच्या 5 सप्टेंबर 2024 पासून एका शाळेला 51 पुस्तकांची भेट देण्यात येणार आहे.ही पुस्तक भेट योजना शालेय स्तरावर असल्याने,यात लहान मुलांसाठीच्या पुस्तकांचा अधिक समावेश असणार आहे.सय्यद गुरुजी अर्थात सय्यद अमीनोद्दीन गुरुजी हे मौजे चिंचाळा,तालुका आष्टी,जिल्हा बीड येथील रहिवासी होते.त्यांनी त्यांची संपूर्ण अध्यापन सेवा ही आष्टी तालुक्यात जिल्हा परिषद अंतर्गत केली.त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले.जिल्हा परिषद शाळांच्या इमारत बांधकामासाठी वेळोवेळी सरकार दरबारी गावकऱ्यांसोबत पाठपुरावा केला.विनंती केली.एका नाट्यगृह उभारणीसाठी सामाजिक,ऐतिहासिक नाटकांचे दिग्दर्शन करून ग्रामीण भागातील अनेक हौशी कलाकारांना सोबत घेऊन नाट्य प्रयोग केले. जनता वस्तीगृह शिक्षण संस्था तथा जनता विद्यालय,महाविद्यालय सचिव आणि माजी सभापती,पंचायत समिती आष्टी,विजयकुमार बांदल अण्णा यांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई या नाटकात दत्तक पुत्राची भूमिका केली होती.बीड जिल्ह्याचे खासदार तथा क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा परिषद शाळेच्या इमारत उद्घाटन कार्यक्रमासाठी यावेत,याचा पुढाकार घेणारांपैकी ते एक होते.क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही सय्यद गुरुजी त्यांनी केले होते.सन 1980 साली त्यांनी या जगाचा निरोप घेतला.पुस्तके भेट देण्याचा उपक्रम दरवर्षी 5 सप्टेंबर अर्थात शिक्षक दिनाच्या निमित्ताने राबविला जाणार आहे.असे सय्यद गुरुजी त्यांचे चिरंजीव प्रसिद्ध कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.