स्व. मायाताई शिंदे स्मृति गौरव पुरस्काने सौ.बेबीताई कऱ्हेकर सन्मानित

0
256

   पुणे प्रतिनिधी

दि.३० ऑगस्ट रोजी, श्री संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्ताने प्रतिवर्षी दिला जाणारा समाज गौरव पुरस्कार सोहळा मा.श्री.भगवानराव बिडवे यांच्या अध्यक्षतेखाली श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कात्रज येथे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी सकाळी संत श्रेष्ठ श्री संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रवचन, भजन व हरिपाठ आदी. कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.समाजात ध्येयनिष्ठेने आणि सेवाभावी वृत्तीनेकार्य करणाऱ्यांची व व त्यांच्या समाजकार्याची नोंद समाज ठेवतो. अशाच समाजसेवकांचा सन्मानही समाजाकडून होतो हे निश्चित. सौ.बेबीताई कऱ्हेकर यांनीही निस्वार्थी भावनेने  समाजासाठी कार्य केले म्हणूनच आज त्यांना स्वर्गीय. मायाताई शिंदे स्मृतीगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असल्याचे, प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. भगवानराव बिडवे यांनी केले. सामाजिक क्षेत्रात वंचित, गोरगरीब, निराधार घटकांसाठी कार्य करणाऱ्या तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा स्वर्गीय मायाताई शिंदे स्मृती गौरव पुरस्कार गेल्या आठ वर्षापासून श्री.भगवानराव शिंदे व त्यांच्या सुविधा पत्नी सौ.अनिता शिंदे यांच्या प्रेरणा, सहकार्य आणि मार्गदर्शनातून काळभैरव नाभिक संघटना कात्रजच्यावतीने प्रतिवर्षी देण्यात येतो. यावर्षी पुणे येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. बेबीताई कऱ्हेकर यांना या वर्षाचा पुरस्कार, स्मृतीचिन्ह व रोख पाच हजार पाचशे एक असा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यांच्यासह पोलीस अधिकारी श्री. सुनील जी पगारे, सामाजिक क्षेत्रातील सौ गीतांजली जाधव श्री. राजेंद्र फरांदे, श्री.अजय साबळे, व उद्योजक श्री.अजय पुजारी यांचाही स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी कु ज्ञानेश्वरी शिंदे ही विद्यार्थिनी सी.बी.एस. सी. बोर्डात इयत्ता दहावी मध्ये 90% गुण मिळवून उत्तीर्ण झाली याबद्दल तिचाही स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे सर्वश्री प्रभाकर शेठ कदम डॉक्टर अरविंद झेंडे, रामदास सैंदाणे, ह भ सुरेश आण्णा शिंदे, शिवाजीराव वरपे, अविनाश पवार, प्रदीप गायकवाड आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमोल दळवी संदीप नन्नावरे दीपक सोनवणे श्रीमंगले सुरवसे हेमंत साबळे आदींनी विशेष प्रयत्न केले तर संयोजकांच्या वतीने आभार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here