आष्टी: शैक्षणीक कार्य करीत असताना समाजाभिमुख काम करणाऱ्या पारंपरिक महाविद्यालयातील प्राध्यापकांना दिला जाणारा समाजाभिमुख उत्कृष्ट प्राध्यापक राष्ट्रीय पुरस्कार स्वा. सावरकर महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. रुपाली कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे. शनिवार दि. 17 ऑगस्ट रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात संस्थाध्यक्ष श्री. किशोर हंबर्डे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै. बन्सीधर धोंडीबापू हंबर्डे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी पारंपरिक महाविद्यालयात अध्यापन करणाऱ्या आणि समाजाशी बांधिलकी जपणाऱ्या प्राध्यापकांना समाजाभिमुख उत्कृष्ट प्राध्यापक राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो. शैक्षणीक अथवा संशोधनात्मक कार्य पदोन्नती साठी आवश्यक असते, ते कार्य न पाहता केवळ वेगवेगळ्या क्षेत्रात केलेले सामाजिक कार्य लक्षात घेऊन हा पुरस्कार दिला जातो. या वर्षी देशभरातून एकूण 24 प्रस्ताव आले होते.
डॉ. रुपाली कुलकर्णी यांचे अनाथ, निराधार लोकांसाठी व शेतकऱ्यांसाठी असलेले कार्य व बीड शहरातील नागरिकांना बोर पुनर्भरण विषयी केलेले प्रत्यक्ष कार्य तसेच मुक्या प्राण्यांविषयी संवेदना जागृती कार्य पाहून त्यांची निवड करण्यात आली. बीड येथील सावरकर महाविद्यालयात भौतिकशास्त्र विषयाचे अध्यापन करत असताना त्यांनी केलेल्या समाजाभिमुख कार्याचा गौरव म्हणुन आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. किशोर हंबर्डे यांच्या हस्ते शनिवारी या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
Home Uncategorized डॉ. रुपाली कुलकर्णी यांना ॲड. बी. डी. हंबर्डे समाजाभिमुख उत्कृष्ट प्राध्यापक राष्ट्रीय...