ढाकलगाव, गेवराई ते चाकरवाडी पायी दिंडीत सहभागी व्हा- अंबादास गिरी,विठ्ठल जगदाळे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गेवराई: बीड जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चाकरवाडी येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ढाकलगाव, गेवराई, ते चाकरवाडी पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व माऊली भक्तांनी पायी दिंडीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान माऊली भक्त अंबादास गिरी यांनी केले आहे
दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात ते म्हणाले की दिनांक 31 बुधवार रोजी ढाकलगाव येथुन गेवराई मार्गे चाकरवाडी येथे पायी दिंडीत सहभागी होण्यासाठी मोबाईल क्रमांक 8669092094 वर संपर्क करून पायी दिंडीत सहभागी व्हावे अमावस्याच्या निमित्त गेल्या अनेक वर्षापासून पायी दिंडीचा आयोजन करण्यात येत आहे यावेळी मोठ्या प्रमाणात युवक वर्ग पायी दिंडीत सहभागी होत असतो यामुळे दिंडी सहभागी होणार याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे तरी येऊ घातलेल्या अमावस्याच्या निमित्ताने धाकलगाव गेवराई ते चाकरवाडी पायी दिंडी दिनांक 31 रोजी निघणार असून सर्व माऊली भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने पायी दिंडी त सहभागी व्हावी असे आव्हान माऊली भक्त अंबादास गिरी, विठ्ठल जगदाळे, वादे माऊली वादे, कृष्णा वादे, राजाभाऊ आवटी, अजय चौरे, पप्पू बांडे, अशोक जवळ, मनोज घोडके, अशोक भिडे, गणेश शेलार, आदी माऊली भक्तांनी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात केले आहे