गेवराई
जिल्ह्य़ात दुष्काळी चित्र असल्याने, गेल्या दोन महिन्यांपासून जिल्हा प्रशासनाकडून ग्रामीण भागात पाणी पुरवठा केला जात असून ; गेवराई पंचायत समितीचा पुरवठा विभाग कागदी मेळ घालून ग्रामीण भागातील जनतेची फसवणूक करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. टॅन्करच्या माध्यमातून होत असलेल्या फेऱ्या नियमांनुसार न टाकता, फेऱ्या मध्ये हातचलाखी केली जात आहे. त्यामुळे,
पाणी धर्माला “कलंक” लावणाऱ्या पंचायत समितीचीम्या भ्रष्ट यंत्रणेला कुणाचे अभय ? असा खडा सवाल उपस्थित केला जात आहे.दरम्यान, गेवराई पंचायत समितीचा पाणी पुरवठा विभाग, गट विकास अधिकारी श्रीमती मिना का॔बळे यांच्या छत्रछायेखाली पाणी टंचाईच्या माध्यमातून टॅन्करच्या नळाखाली हात ओले करून घेत असल्याची चर्चा असून, या संदर्भात विभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात येणार आहे.बीड जिल्ह्य़ात, गेल्या वर्षीच्या मोसमी हंगामात पावसाने ओढ दिल्याने, फेब्रुवारी [ २०२४ ] च्या पहिल्याच आठवडय़ात ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले होते. पाणी टंचाई निर्माण झाल्याने, पाण्यासाठी
नागरीकांना वणवण भटकंती करून, तहान भागवावी लागली आहे. त्यामुळे, जिल्हा प्रशासनाने तातडीने उपाय योजना करून, जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात टॅन्करनेपाणी पुरवठा सुरू केला. गेवराई नगर परिषदेच्या जलकुंभातून ग्रामीण भागात शुद्ध पाणी टॅन्करमध्ये भरले जात असून, आमदार लक्ष्मण पवार यांच्या दूरदृष्टीतून, पैठण नाथ सागराची पाणी पुरवठा योजना ग्रामीण भागासाठी उपयोगी आली आहे.गेवराई तालुक्यातील ७८ गावात, 120 टॅन्कर द्वारे पाणी पुरवठा केला जात असून, एक दोन ठिकाणी विहिर अधिग्रहण करण्यात आली आहे. त्या विहिरीतूनसंबंधित गावांना टॅन्करच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे.मात्र, नियमानुसार टॅन्करच्या फेऱ्या होत नाहीत. पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाच्या दप्तरी रितसर नोंद करून, टॅन्कर नेमून दिलेल्या ठिकाणी पाठवले जात आहे. वास्तविक पाहता, जिथे दोन फेऱ्या तिथे एकच फेरी टाकून, दप्तरी दोन फेऱ्यांची नोंद केली जात असून, याच पद्धतीने फेऱ्या मध्ये हातचलाखी केली जात आहे. पंचायत समितीचा पाणी पुरवठा विभाग, पाणी पुरवठा करणाऱ्या टेन्डर धारकांना कागदोपत्री मदत करत आहे. कागदी मेळ घालून फेऱ्या दाखविल्या जात आहेत. या संदर्भात, ग्रामीण भागातील नागरिकांनी तोंडी तक्रारी केल्या आहेत. परंतू , या तक्रारीकडे बीडीओ श्रीमती कांबळे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. या संपुर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून, टॅन्करचा पाणी घोटाळा उघडकीस आणावा, अशी मागणी होऊ लागली आहे.श्रीमती मिना कांबळे यांच्या कडे तक्रार घेऊन आलेल्या नागरिकांना नीटपणे उत्तरे दिली जात नाहीत. त्या उगीचच चिडचिड करून, तक्रार करणारांवर अप्रत्यक्ष दबाव टाकतात. ओरडून बोलतात. पंचायत समितीच्या अंतर्गत येणाऱ्या फाईल्स वर सही न करणे, त्या रोखून धरने, ग्रामीण भागातील नागरिकांच्या प्रश्नाकडे करणे, विशिष्ट लोकांना थेड केबिन मध्ये बोलावून फाईल्स निकाली काढण्या संदर्भातली त्यांची भूमिका संशयास्पद असल्याची चर्चा असून, हेतू ठेवून काही फाईल्स वर बीडला येऊन सही घ्या, असा आदेश कर्मचाऱ्यां मार्फत पोहचवला जात असल्याची चर्चा आहे.