गेवराई प्रतिनिधी
गेवराई [ जि.बीड ] मतदारसंघात ग्रामीण भागातील जिल्हा ,राज्य रस्ता मार्गाची कामे जोरात सुरू झाली आहेत. मतदारसंघात चार ठिकाणी सुरू असलेला रस्ता एकुण 124 किलोमीटर लांबीचा आहे. हे रस्ते डांबरीकरण आणि सिमेंट काँक्रिटच्या माध्यमातून तयार केले जात असून, त्यासाठी 662 कोटी 31 लाखाचा [ सहाशे बासष्ट कोटी ] खर्च करण्यात येणार आहे. दरम्यान, आमदार लक्ष्मण पवार यांनी केलेल्या पाठपुराव्याने ग्रामीण भागातील विकासाचा मार्ग सुकर होऊ लागला आहे. चार ही रस्त्याची कामे प्रगतीपथावर असल्याने, ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.
गेवराई घऱ्ळाटा अन धोंडराईला बारा वाटा, अशी म्हण ; गेवराई तालुक्यात प्रसिद्ध होती. बहुतेक ठिकाणी ग्रामीण भागात रस्त्यांची अवस्था बिकट झालेली होती. उमापूर, तलवडा, पाचेगाव, पाडळसिंगी, मादळमोही, चकलांबा, जातेगाव परिसरातून जाणारे रस्ते खडबडीत झालेले होते. मात्र, गेल्या दहा वर्षांपासून रस्त्याची प्रलंबित प्रश्न निकाली निघू लागल्याचे समाधानकारक चित्र दिसून येऊ लागले आहे.
आमदार पवार यांनी रस्त्याचा प्रश्न गांभीर्यपूर्वक तडीला जाईल, या दृष्टिकोनातून रस्त्यासाठी पाठपुरावा करून, निधी आणल्याने
दळणवळणाचा विषय मार्गी लावला आहे. गेवराई तालुक्यातील सिरसदेवी उमापूर, चकलांबा, तलवडा, जातेगाव, पाचेगाव, पाडळसिंगी, गढी, बागपिंपळगाव परिसरातले गावे राज्य, राष्ट्रीय महामार्गावर आले आहेत. त्यामुळे, रस्त्यावर वाहनधारकांनी ये-जा वाढली आहे. व्यावसायिकांना फायदा होऊ लागला आहे. लहान-मोठी गावे पाच दहा मिनिटाच्या अंतरावरच्या जिल्हा, राज्य-महामार्गावर आली आहेत. त्याचा फायदा होऊ लागला आहे. सद्यस्थितीत गेवराई मतदारसंघात पाडळसिंगी- पिंपळनेर- वडवणी रस्ता राज्यमार्ग – 232 [ 171.35 कोटी ], चकलंबा राजपिंपरी गेवराई रस्ता प्रथम जिल्हा मार्ग -20 [ 160 कोटी ] ,गेवराई – तलवाडा – माजलगाव रस्ता राज्यमार्ग- 50 [ 173.76 कोटी ], गेवराई – जातेगाव – सेलू रस्ता प्रजिमा- 20 [ 157.20 कोटी ] रस्त्याची कामे प्रगतीपथावर आहेत. या सगळ्या कामाकडे आ. पवारांचे लक्ष आहे. वेळ काढून रस्तावर उभे राहून, कामाची क्वालिटी पाहत आहेत. अधिकारी, कंत्राटदारांना सूचना दिल्या जात आहेत. रस्तावर जेवढे थर दिले पाहिजेत, तेवढे थर अंथरलेत की नाही. याकडे सजग राहून कामाचा दर्जा पाहिला जात आहे. दरम्यान, आमदार पवारांच्या पाठपुराव्याने ग्रामीण मतदारसंघात विकासाचा मार्ग सुकर होऊ लागलाय. ग्रामीण भागात जिल्हा ,राज्य रस्ता मार्गाची कामे जोरात सुरू आहेत. एकूण 124 किलोमीटर लांबीचा रस्ता तयार होत आहे. सदरील रस्ता डांबरीकरण आणि सिमेंट काँक्रीटचा तयार केला जात असून, त्यासाठी 662 कोटी 31 लाखाचा [ सहाशे बासष्ट कोटी ] खर्च करण्यात येणार आहे. मराठवाडय़ातल्या एकमेव मतदारसंघात रस्त्याची कामे प्रगतीपथावर असून, ग्रामीण भागातील नागरीकांनी, याचे श्रेय आ. पवारांना देऊन समाधान व्यक्त केले आहे.