आष्टी प्रतिनिधी
जिद्द,चिकाटी आणि मनात केलेला निश्चय पूर्ण करणार याचं कु.उजमा शेख मूर्तिमंत उदाहरण आहे.तिला जन्मापासूनच संघर्षाचा सामना करावा लागला.तो संघर्ष एका मार्कामुळे संधी हुकण्यापर्यंत करावा लागला.पण ती मागे हटली नाही.कोरोना या भयंकर रोगाचा तिला फटका बसला.उजमा शेख आज पोलीस उपनिरीक्षक होत आहे.तिची संघर्ष गाथा लक्षात घेऊन हंबर्डे महाविद्यालयातील विद्यार्थी,विद्यार्थिनींनी तिचा आदर्श घ्यावा.आमच्या महाविद्यालयाची विद्यार्थिनी आज संपूर्ण महाराष्ट्राची आदर्श होत आहे.याबद्दल तिचा आम्ही गौरव करतो.असे संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे म्हणाले.हंबर्डे महाविद्यालय सभागृहात दिनांक 28 मार्च रोजी हंबर्डे महाविद्यालय,आष्टी तालुका वकील संघ,आष्टी तालुका डॉक्टर असोसिएशन,आष्टी तालुका व्यापारी संघटना,आष्टी तालुका सर्व पत्रकार संघ,सर्व सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नागरी सत्कार समारंभाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते.प्रस्ताविक प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे यांनी केले.डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.विलास सोनवणे,वकील संघ अध्यक्ष हनुमंत शिंदे,व्यापारी संघाचे अध्यक्ष संजय सेठ मेहेर,पत्रकार संघाच्या वतीने अविशांत कुमकर, कॉम्प्युटर विभागाचे प्रा.आगलावे,जि.प.कन्या प्रशालाच्या शिक्षिका डॉ.अनिता चव्हाण,डॉ. नदीम शेख,एडवोकेट रत्नदीप निकाळजे, सज्जाद शेख,अंकुश पोटे,लक्ष्मण रेडेकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली.सत्कारमूर्ती पोलीस उपनिरीक्षक कु.उजमा शेख म्हणाली की,हंबर्डे महाविद्यालयातील प्राचार्य डॉ.निंबोरे साहेब,सर्व प्राध्यापक,कर्मचारी वृंद यांनी मला नेहमीच प्रोत्साहन दिले.आणि आईच्या कठोर परिश्रमामुळे यशस्वी होऊ शकले.यावेळी वकील संघातील अनेक मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला.संस्थेचे सचिव अतुल शेठ मेहेर, डॉ.गणेश पिसाळ,डॉ.महेश चौरे,सुभान शेठ पठाण,एडवोकेट राकेश हंबर्डे,पत्रकार मुजाहीद्दीन,जावेद पठाण,डॉ.प्रकाश झांजे,कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन,हाजी अज्जू भाई शेख,कमलेश कासवा,अरुण भैय्या निकाळजे, सादिक कुरेशी,गीतांजली जगताप,सय्यद असलम असे अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अभय शिंदे, प्रा.सायली हंबर्डे यांनी केले.दत्तात्रय मुंढे यांनी आभार मानले.यावेळी सभागृह प्रेक्षकांनी तुडुंब भरले होते.