गेवराई (प्रतिनिधी) दि. 15/3/24 रोजी ज्येष्ठ नागरिक संघ गेवराई येथील कार्यालयात ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा गेवराई यांच्या वतीने ग्राहक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्री नितीन जी शेट्टी म्हणून उपस्थित होते. तसेच बीड जिल्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्र उपाध्यक्ष व गेवराई ग्राहक पंचायत मार्गदर्शन केंद्रप्रमुख अनिल बोर्डे व गेवराई ग्राहक पंचायत अध्यक्ष प्रा भानुदास फलके , इंजिनीयर नारायण अवधूत विश्वास चपळगावकर प्रा. अंबादास चव्हाण अशोक देऊळगावकर गणेश रामदासी मोहन राजहंस आधी हजर होते. ग्राहक पंचायत चे कार्य घराघरापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे निश्चित झाले त्याशिवाय ग्राहकाची ऑनलाइन फसवणूक होणार नाही तसेच आज गुंतून गुंतवणूकदार देखील अडचणीत आल्याचे निदर्शनास येत आहे ही गंभीर बाब आहे तरी सर्व ग्राहकानी एकत्र येणे काळाची गरज आहे तसेच ग्राहक राजा संघटित नसल्यामुळे अडचणीत येत आहे व त्याची फसवणूक होत आहे त्यासाठी त्यांनी जागृत राहून घराघरात त्याला कार्याची माहिती असणे आवश्यक आहे त्याशिवाय त्याशिवाय त्याची फसवणूक थांबणार नाही असे श्री अनिल बोर्डे यांनी प्रत्यक्ष सांगितले.