गेवराई (प्रतिनिधी) तेथील प्रसिद्ध ज्येष्ठ वकील अँड रवींद्र अंबादास जोशी गेवराईकर यांची भारत सरकार नोटरी पदी निवड करण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या यादीनुसार विविध ठिकाणचे नोटरी पदे जाहीर करण्यात आली असून यामध्ये अँड रवींद्र जोशी ही गेवराई येथील न्यायालयात वकिली करत असून त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.