जनतेच्या विश्वासास पात्र ठरतोय म्हणून स्वतःच्या नजरेत पडायची कधीच वेळ आली नाही :- आमदार लक्ष्मण पवार

0
105

गेवराई – जातेगाव ते सेलू सिमेंट काँक्रिट रस्ता कामासाठी हॅब्रीड ॲन्यूटी अंतर्गत तब्बल 283 कोटी रुपये मंजूर

गेवराई वार्ताहर :- गेवराई मतदार संघातील गेवराई (रा म मा 222) ते जातेगाव – सेलु व जातेगाव ते रा म मा 61 (माजलगाव रोड) या 07 मीटर रुंदीच्या सिमेंट काँक्रेट रस्त्याच्या कामासाठी हॅब्रीड ॲन्यूटी अंतर्गत 283 कोटी रुपये मंजूर झाले असून सदर कामाची निविदा सूचना (टेंडर नोटीस) प्रसिद्ध झाली.त्यानंतर आमदार लक्ष्मण पवार यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात अशी भावना व्यक्त केली की जनतेने माझ्यावर 2014 ला जो विश्वास टाकला त्या विश्वासास मी कुठेतरी पात्र ठरतोय, म्हणून ज्या वेळेस मी आरशासमोर उभा राहतो त्यावेळेस मला स्वतःच्या नजरेत पडण्याची कधीच वेळ आली नाही. कारण मी सत्तेचा उपयोग स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी न करता ज्या मतदारांनी माझ्यावर विश्वास टाकला त्यांच्या अडचणी कमी करण्यासाठी केला आहे.दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात आमदार पवार पुढे म्हणाले की चकलांबा ते गेवराई रस्त्याचे काम हॅब्रीड ॲन्यूटी अंतर्गत सुरू आहे. त्याच रस्त्याची शिल्लक राहिलेली लांबी गेवराई – जातेगाव माजलगाव रोड या रस्त्याच्या कामाला देखील हॅब्रीड ॲन्यूटी अंतर्गत मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध व्हावा अशी माझी इच्छा होती.महाराष्ट्रातील निष्क्रिय आघाडी सरकार गेल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा युती सरकार सत्तेवर आल. युती सरकार सत्तेवर येताच मी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्रजी चव्हाण यांच्याकडे या कामासाठी सतत पाठपुरावा केला. आज त्या पाठपुराव्याला मोठ यश प्राप्त झाल आहे.लवकरच सदर कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होईल व 07 मीटर रुंदीचा अत्यंत दर्जेदार सिमेंट काँक्रेट चा रस्ता मतदारसंघातील जनतेसाठी उपलब्ध होईल.येणाऱ्या काळात लवकरच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून मतदार संघात सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मतदार संघात प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामासाठी देखील मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होणार आहे. आर डी एस एस योजनेच्या माध्यमातून नवीन 33 केव्ही केंद्र उभारणीसाठी देखील मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणार आहे. पी एम श्री योजना व आदर्श शाळा विकास योजने अंतर्गत मतदार संघातील शाळांच्या विकासासाठी देखील येणाऱ्या काळात मोठा निधी उपलब्ध होणार आहे. तसेच लवकरच पैठण उजव्या कालव्याचे देखील नूतनीकरणाचे काम सुरू होणार आहे. मृदा व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून मतदार संघात नदी नाल्यांवर मोठ मोठे बंधारे निर्माण करून पाणी अडवण्यावर देखील भर दिला जाणार आहे. मराठवाडा वॉटर ग्रीडच्या कामाला गती मिळावी यासाठी देखील युती सरकार कटिबद्ध असून मी त्याबाबत सतत पाठपुरावा करत आहे.या माध्यमातून मतदार संघातील जनतेला उत्तम दळणवळणाच्या सुविधा, उत्तम आरोग्याच्या सुविधा, मुलांना दर्जेदार शिक्षणाची सुविधा, शेतीसाठी व पिण्यासाठी पाण्याची उपलब्धता व सुरळीत विद्युत पुरवठा उपलब्ध करून देणे हाच मनाशी ध्यास असून हेच उद्दिष्ट घेऊन मी राजकारणात काम करत आहे.सत्तेचा उपयोग केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी करणाऱ्या आपल्या राजकीय विरोधकांना आपल्या राजकीय शैलीत आमदार पवार यांनी टोला लगावला.आमदार पवार म्हणाले आमच्या विरोधकांच मिर्झा गालिब यांनी म्हटल्याप्रमाणे “गालिब युही हमेशा गलतिया करता रहा, धुल चेहरे पे थी, आईना साफ करता रहा.” याप्रमाणे झाले आहे. सत्तेचा उपयोग वैयक्तिक स्वार्थासाठी करायचा आणि निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर मतदारांना दोष द्यायचा. मात्र स्वतःत काहीच बदल करायचा नाही अशी माझ्या राजकीय विरोधकांची मानसिकता आहे.
दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात शेवटी आमदार पवार म्हणाले की मतदार संघात मजबूत रस्त्यांचा जाळ निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या मालाला योग्य भाव मिळेल अशी बाजारपेठ शोधता येईल.सहजासहजी बाजारपेठेत आपला माल घेऊन जाता येईल. तर स्वतःचा व्यवसाय सुरू करणाऱ्या होतकरी तरुणांना ग्रामीण भागामध्ये देखील कमी भांडवलात आपला छोटासा स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा यासाठी या दळणवळणाच्या सुविधेच्या माध्यमातून पोषक वातावरण निर्माण करण्याचा माझा सदैव प्रयत्न राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here