वाळू उपसा होताच तलाठी आक्रमक भुमिका घेतात

0
259

मग गेवराईतील तलाठी मुग गिळून का गप्प बसतात

अंबड प्रमाणे गेवराई महसुल कधी आक्रमक होणार !

गेवराई, (प्रतिनिधी):- गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथील स्टाॅक टेंडरच्या नावाखाली म्हाळसपिंपळगाव व सावरगाव येथे खुलेआम अवैध वाळू उपसा सध्या होत आहे.याच टेंडरच्या नावाखाली गेवराई तालुक्यातील गोदावरी नदी पाञ सोडून १० फुटावर असलेल्या अंबड तालुक्यात बेसुमार अवैध वाळू उपसा ही मंडळी करताच अंबड महसुल विभागाने हिसका दाखवत संबधित वाळू माफियांवर आपल्या हद्दीतून उपसा केल्या प्रकरणी थेट पोलीस ठाणे गाठून गुन्हे दाखल केले.माञ गेवराई तालुक्यात मागील दोन वर्षांपासून खुलेआम दिवसा ढवळ्या हा उपसा नदी पाञातून होत आसताना गेवराई तालुक्यातील या भागातील तलाठी मंडळ आधिकारी व पथकप्रमुख अर्थपुर्ण व्यवहारारामुळे मुग गिळून का गप्प बसत आहे,असा प्रश्न पॅन्थर रिपब्लिकन पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष धम्मपाल कांडेकर सह ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे.दरम्यान अंबड महसुल प्रमाणे गेवराई महसुलचे वरिल मंडळी वाळू माफियांवर कडक कारवाया अथवा गुन्हे दाखल करण्यास म्हणावे तसे धाडस दाखवत नसल्याने गेवराई हद्दीत हा वाळू उपसा दिवसेंदिवस सुरुच राहत आसल्याचे दिसुन येत आहे.याला सर्वश्री गेवराई महसुलचे वरिल तीन मंडळी जवाबदार असुन ते गेवराई व बीड येथील वरिष्ठांना न जुमवता राजकीय पाठबळावर या ठिकाणी दोन ते तीन वर्षापासून केवळ वाळूच्या अर्थपुर्ण व्यवहारारामुळेच खुर्चीला ठाण मांडून बसून आसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून व्यक्त केल्या जात आहेत.
अंबड व गेवराई तालुक्याच्या मध्यभागातून गोदावरी नदी पाञात राक्षसभुवन,म्हाळसपिंपळगाव व सावरगाव येथे शासनाच्या स्टाॅक टेंडरच्या नावाखाली अवैध वाळू उपसा खुलेआम सुरु आहे.हा उपसा गेवराई महसुलचे तलाठी,मंडळ आधिकारी व पथकप्रमुख यांना खुलेआम अर्थपुर्ण व्यवहार करण्यासाठी,तसेच ही मंडळी राजकीय पाठबळावर या भागात केवळ वाळूपायी दोन ते तीन वर्षांपासून आपल्या खुर्चीला ठाण मांडून बसून आहेत.या भागात चाललेला वाळूचा नंगानाच केवळ या तीन मंडळीमुळे होऊ लागला आहे.महसुलच्या या मंडळींना राजकीय पाठबळ असल्याने ते गेवराई व बीड येथील कोणत्याही वरिष्ठ आधिका-यांना जुमानत नाही.त्यातच याच ठिकाणी वाळू माफिया अंबड तालुक्यात घुसखोरी करताच येथील महसुलचे सर्वच मंडळी आक्रमक भुमिका घेत गेवराईतील लोकांवर गुन्हे दाखल करुन कारवाया करतात.मग गेवराईतील महसुल वरिल तीन मंडळी अर्थपुर्ण व्यवहारारामुळे झोपेतच आसतात.त्यांना अंबड महसुल प्रमाणे कधी जाग कधी येईल व पैशापायी आजून किती दिवस झोपेचे सोंग घेणार याबाबत गेवराई व बीडच्या वरिष्ठ आधिका-यांनी भुमिका स्पस्ट करुन गेवराई या तीन दोषींवर कडक कारवाई करुन त्यांच्यावरच गुन्हे दाखल करण्याची मागणी आता होऊ लागली आहे.

                * चौकट *

गेवराई तालुक्यात वरिल तीन महसुलच्या कर्मचाऱ्यांच्या अर्थपुर्ण व्यवहारारामुळे वाळू उपसा सुरु आहे.तसेच दोन ते तीन वर्षापासून ते या भागात ठाण मांडून असुन त्यांना राजकीय पाठबळ मिळत आसल्याने शासनाचा कोट्यावधीचा महसुल बुढत आहे.महसुलच्या या लोकांची तत्काळ गेवराई तालुक्याबाहेर तत्काळ बदल्या करण्यात याव्यात अशी मागणी पॅथर्स रिपब्लिकन पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष धम्मपाल कांडेकर यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here