वंचित घटकांपर्यंत सुविधांचा लाभ देणे आमची जबाबदारी : संजय सोनवने

0
212

गेवराई प्रतिनिधी :
सर्व समाजातल्या असंख्य वंचित बहुजन घटकांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी शासन व प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी
प्रमाणीकपणे प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन नायब तहसीलदार संजय सोनवने यांनी येथे बोलताना व्यक्त केले.
महाराजस्व अभियान अंतर्गत राजे उमाजी नाईक, सर्व भटके विमुक्ततांना शासकीय प्रमाणपत्र वाटप करण्याचा कार्यक्रम दि.२ मार्च रोजी दुपारी २ वाजता हिरापुर येथे तहसिल कार्यालया मार्फत पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी तहसिलदार संदिप खोमने, नायब तहसिलदार संजय सोनवने यांची उपस्थित होती. या कैम्प मध्ये शेकडो भटक्या विमुक्ततांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे.

भटके विमुक्त समाजातील नागरिकांना आधार कार्ड, मतदान कार्ड,राशन कार्ड सह महत्वाचे कागदपत्रे उपलब्ध नसल्याने हे नागरिक अनेक शासकीय योजने पासून वंचित राहतात, अशा सर्व नागरिकांना त्यांचा हक्क मिळावा हा प्रमाणिक उद्देश डोळ्या समोर ठेवून महाराष्ट्र शासनाने भटके विमुक्तासाठी महाराजस्व अभियान अंतर्गत राजे उमाजी नाईक सर्व भटके विमुक्ततांना शासकीय प्रमाणपत्र प्रदान राज्यव्यापी अभियान राबविण्यात आले आहे. याच अनुषंगाने, गेवराई तहसिल कार्यालया तर्फे तालुक्यातील हिरापुर येथे भटक्या विमुक्ततांचे मेळावा आयोजित करुन तहसीलदार संदीप खोमणे, नायब तहसीलदार संजय सोनवणे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले असून यावेळी सरपंच ,उपसरपंच अमजद पठाण,
मंडळ अधिकारी जगदीश सोळशे, तलाठी अक्षय ढोफे, अविनाश लांडे, अमोल कोंढरे , शीला काळे , योगेश कापसे , सर्व ग्राम पंचायत सदस्य सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here