गेवराईत आ.लक्ष्मण पवार यांच्या कार्यालयात सुपर वरीअर्स व बूथ प्रमुखांची बैठक संपन्न
गेवराई (प्रतिनिधी) तळागाळातील प्रामाणिक कार्यकर्ते आणि गावपातळीवर काम करणारे बूथ वारिअर्स हीच खरी पक्षाची ताकद असून याच कार्यकर्त्यांच्या जीवावर भाजप पक्ष देशात आणि राज्यात सत्तेवर आसून येणाऱ्या काळातही देशात मोदी सरकार आणि राज्यात महायुतीचीच सत्ता येणार असल्याचे प्रतिपादन भाजपचे मराठवाडा बूथ वारिअर्स समन्वयक ऍड. अनिल काळे यांनी केले.
आ.लक्ष्मण पवार यांच्या कार्यालयात अयोजित बूथ वारिअर्सच्या बैठकी प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर युवा नेते शिवराज पवार, भाजप जिल्हा विस्तारक बाबासाहेब आगे, मा.नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, राजेंद्र राक्षसभुवनकर, गेवराई विधानसभा मुदारसंघ प्रमुख शाम कुंड, पंचायत समिती सदस्य अनिल काका पौळ, माजलगावचे नगरसेवक शरद यादव, शरद कचरे यांच्यासह आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, तळागाळातील संघटन आणि रचनेच्या जोरावर सत्ता मिळवता येते हे गेल्या दहा वर्षात भारतीय जनता पार्टीने दाखवून दिले. म्हणून आजच्या काळात पुन्हा नव्याने बदल करत पार्टीने बूथ पासूनच ताकदीचे सुपर वारिअर्सची निवड करून येणाऱ्या निवडणुकीचे भक्कम नियोजन केले आहे. कार्यकर्त्यांमधूनच लोकप्रतिनिधी उदयास येतो आणि पक्षाची खरी ताकद ही बूथ प्रमुखच असून या बूथ प्रमुखांच्या नियंत्रनासाठी आता प्रत्येक गावात एक सुपर वरीअर्सची निवड करून गाव पातळीवर एक समिती निर्माण करायची आणि या समितीच्या माध्यमातून तळागाळातील मतदारपर्यंत जाऊन पक्षाच्या कार्याची जनजागृती करण्याचे काम ही समिती करणार आहे. सामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याचे काम भारतीय जनता पार्टी करत आहे. या पक्षात प्रामाणिकपणे आणि निष्ठेने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय मिळाल्याशिवाय राहत नाही. गेवराई मतदार संघात कार्यकर्त्यांची जाण असणारे आमदार म्हणून लक्ष्मण पवार यांचा राज्यभरात नावलौकिक आहे. तर मागील दहा वर्षाच्या काळात कार्यकर्त्यांनीही आपली ताकद दाखवून देत पक्षाला भरभरून दिले आहे. त्याप्रमाणेच येणाऱ्या काळातही तळागाळातील प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे पक्षाचे काम करून आपल्या गावच्या विकासाला गती देण्याचे काम करावे. उद्याच्या लोकसभा निवडणुकीत आपल्या देशात पुन्हा मोदी सरकार तर राज्यात महायुती सरकार सत्तेवर येणार आहे. तर आपल्या गेवराई विधानसभा मतदार संघात पुन्हा आ.लक्ष्मण अण्णांच्या रूपाने प्रामाणिक आमदार आपण निवडून देत हँट्रिक करणार असल्याचा विश्वास पक्षाच्या वरिष्ठांना आसल्याचे त्यांनी सांगितले व निवडणुकीच्या काळात आपापल्याला स्तरावर सुपर वरीअर्सने सतर्क राहून पक्षाची ताकद वाढवावी असे आवाहन केले. यावेळी शिवराज पवार, राजेंद्र राक्षसभुवनकर, प्रा. शाम कुंड यांच्यासह आदींनी गेवराई तालुक्याच्या बूथ स्थरावरील कार्याचा आढावा सांगितला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गेवराई तालुका विस्तारक ईश्वर पवार यांनी सूत्रसंचालन प्रा. येळापुरे यांनी केले तर पांडुरंग थडके यांनी उपस्थितीतांचे आभार मानले.