गेवराई: (प्रतिनिधी) भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित श्री चिंतेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात संत गाडगे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली प्रसंगी विद्यार्थ्यां समवेत प्रतिमा पूजन करण्यात आले.उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना श्रीम. माने ताई यांनी संत गाडगे महाराजांच्या जीवन चरित्रावर माहिती सांगितली तर श्री.चंदने सर यांनी संत गाडगे बाबांनी समाजाला दिलेला संदेश विद्यार्थ्यांना सांगितला व प्रत्येकाने स्वतःच्या जीवनात अंगीकार करावा असे सांगितले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीम.वक्ते ताई यांनी केले.प्रसंगी मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.