वार्ता समूहाच्या पुरस्कारांचे 24 फेब्रुवारी रोजी वितरण नगरभूषण पुरस्कार-न्या. प्रशांत कुलकर्णी, सद्भावना पुरस्कार – गुरुदास सेवाश्रम घाटनांदुर, युवा गौरव पुरस्कार इंजि.प्रसाद लांब यांना जाहीर

0
253

अंबाजोगाई / प्रतिनिधी
बीड जिल्ह्याचा मानबिंदू ठरलेल्या आणि सकारात्मक पत्रकारितेची बीजे जोपासणाऱ्या अंबाजोगाई येथील वार्ता समूहाचा सोळावा वर्धापन दिन शनिवार दि. 24 फेब्रुवारी 2024 रोजी साजरा होत आहे.वर्धापन दिनाच्या निमित्ताने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचे वितरण राज्याच्या गुप्तवार्ता विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक व बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र अंकुशराव शिंदे व जगातील सर्वोत्तम शिक्षक पुरस्कार प्राप्त रणजीतसिंह डिसले गुरुजी व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. यंदाचा सन 2024 चा नगरभूषण पुरस्कार हा अंबाजोगाईचे भूमिपुत्र व चंद्रपूर येथील मुख्य न्याय दंडाधिकारी न्या. प्रशांत कुलकर्णी यांना सद्भावना पुरस्कार, घाटनांदुर येथील गुरुदास सेवाश्रम यांना तर युवा गौरव पुरस्कार परभणी व बीड येथील पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रसाद लांब यांना जाहीर करण्यात आला आहे तसेच अंबाजोगाईचा नवतरुण अभिनव अशोक पत्की याने यूपीएससी परीक्षेत यश मिळवल्याबद्दल त्याचाही सत्कार होणार असल्याची माहिती वार्ता समूहाचे संपादक परमेश्वर गित्ते यांनी दिली आहे.
बीड जिल्ह्याच्या पत्रकारितेमध्ये वार्ता समूहाचा वेगळा प्रभाव आहे. बातमीदारी सोबतच सामाजिक भान राखत आगळे वेगळे उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. माध्यमिक क्षेत्रातील होणारे नवनवे बदल लक्षात घेऊन त्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केलेला आहे.दरवर्षी वर्धापन दिनाचे औचित्य साधून समाज धुरीनांचा व भूमिपुत्रांना गौरविण्याची परंपरा सुरू केली आहे. गेल्या सोळा वर्षापासून अंबाजोगाई शहर व तालुक्यातील जे कर्मयोगी आहेत किंवा ज्यांच्यामुळे या तालुक्याचा व शहराचा लौकिक वाढला आहे अशांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जात आहे.आपले भूमिपुत्र ज्या ठिकाणी काम करीत आहेत त्यांच्या कामाचा गौरव व्हावा आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे याअनुषंगाने यंदाचा 2024 चा नगरभूषण पुरस्कार हा अंबाजोगाई चे भूमिपुत्र व चंद्रपूर येथील मुख्य न्यायदंडाधिकारी न्या. प्रशांत प्रभाकरराव कुलकर्णी यांना जाहीर करण्यात आला आहे. न्या. प्रशांत कुलकर्णी हे 1998 पासून विधीक्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच न्यायाधीश म्हणून त्यांनी मुंबई येथे महानगर न्यायदंडाधिकारी, पुणे,पिंपरी – चिंचवड, जळगाव,नागपूर व चंद्रपूर येथे मुख्य न्यायदंडाधिकारी म्हणून सध्या कार्यरत आहेत. सद्भावना पुरस्कार हा घाटनांदुर येथील गुरुदास सेवा आश्रम यांना त्यांच्या वतीने नामदेव महाराज दहिवाळ यांना जाहीर करण्यात आला आहे. घाटनांदुर येथे स्व. गुरुदास महाराज,नामदेव महाराज व त्यांच्या भावंडांनी वैराग्य पत्करून स्वमालकीची १४ एकर शेती संस्थेला दान करून त्या ठिकाणी निराधार,विधवा, परित्यक्ता, विधवा, वृद्ध माता-पिता,बेसहारा मुले यांना आधार देऊन त्यांचे संगोपन केले आहे. गेल्या 50 वर्षापासून ही अखंडित सेवा विनाशुल्क व विना मोबदला चालवली जात आहे.तसेच युवा गौरव पुरस्कार हा अंबाजोगाईचे भूमिपुत्र तथा पाटबंधारे विभाग परभणी व बीड येथे कार्यरत असणारे कार्यकारी अभियंता इंजि.प्रसाद बलभीमराव लांब यांना जाहीर झाला आहे. प्रसाद लांब यांनी दोन्ही जिल्ह्यांमध्ये नेत्र दीपक असे काम केले आहे. काम करीत असताना शासनाचा प्रतिनिधी व शेतकऱ्यांचा सहकारी म्हणून काम केले. असंख्य शेतकऱ्यांना त्यांचा राहिलेला मावेजा मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे.तसेच प्रकल्प मार्गी लावून सर्वांना दिलासा देण्याचे काम केले आहे.म्हणून अशा तरुण सहकार्यास प्रोत्साहन मिळावे आणि त्यांचे मनोबल वाढले पाहिजे यासाठी त्यांना युवागौरव हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे याच कार्यक्रमात अंबाजोगाई येथील नवतरुण अभिनव अशोक पत्की याने यूपीएससी परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल त्याचाही विशेष गौरव व सन्मान केला जाणार आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यास बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र तथा राज्य गुप्तवार्ता विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक अंकुशराव शिंदे ( आयपीएस ) तसेच जगभरात सर्वोत्तम शिक्षक म्हणून नावाजलेले ग्लोबल गुरुजी रणजीत सिंह डिसले गुरुजी ( सोलापूर) यांच्या शुभहस्ते वितरित केला जाणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंबाजोगाई पीपल्स बँकेचे चेअरमन तथा माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी हे राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून पुणे येथील दंतरोगतज्ञ व भारत सरकारच्या दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सल्लागार सदस्य डॉ.आदित्य पतकराव,आयएमए अंबाजोगाईचे अध्यक्ष डॉ. नवनाथ घुगे,अंबाजोगाईचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बालासाहेब लोमटे, केज येथील जनविकास परिवर्तन आघाडीचे संस्थापक हारूनभाई इनामदार, केज येथील नगराध्यक्ष सीताताई बनसोड, अंबाजोगाई नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.उत्कर्ष गुट्टे,केज येथील साने गुरुजी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कविताताई कराड, सेलू जि. परभणी येथील सहाय्यक निबंधक सतीश बनसोडे,अंबाजोगाई येथील केडी एस. क्लासेसचे संचालक प्रा.शिवसागर सर,अंबाजोगाई येथील आधार डायग्नोस्टिक सेंटरचे प्रमुख डॉ. नितीन पोतदार, उद्योजक प्रतापराव पवार, बीड येथील उद्योजक शिवप्रसाद लाहोटी,अंबाजोगाई येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता दिलीपराव बदने,यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत याच कार्यक्रमात अंबाजोगाई शहरातील गुणीजनांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. ज्यामध्ये अंबाजोगाई येथील सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे बालासाहेब माने सर ,सीए परीक्षेत उत्तीर्ण झालेला निखिल लखेरा, महिला व्यावसायिका सुरेखाताई बंग, डॉ. सागर संजय कुलकर्णी, बालरोगतज्ञ डॉ. शेख जुबेर, डॉ.सौ योगिनीताई नागरगोजे, इंजि. सुरेश होळंबे, उद्योजक सदाशिव सोनवणे, मुख्याध्यापक धनंजय शिंदे,पुष्पा महिला बचत गट भारज, गजानन पुरुष बचत गट दत्तपुर यांचा समावेश आहे.तरी शनिवार दिनांक 24 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजता हा कार्यक्रम मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह न. प.अंबाजोगाई या ठिकाणी होणार आहे.तरी या कार्यक्रमास अंबाजोगाई शहर व परिसरातील नागरिक बंधू – भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन वार्ता समूहाचे संपादक परमेश्वर गित्ते, अंबाजोगाई तालुका पत्रकार संघ, तालुका पत्रकार संघ अंबाजोगाई, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार परिषद शाखा अंबाजोगाई, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा अंबाजोगाई, वाईस ऑफ मीडिया शाखा अंबाजोगाई,डिजिटल मीडिया संघ अंबाजोगाई, व गुड मॉर्निंग ग्रुप अंबाजोगाई यांच्यासह इतरांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here