बीड (प्रतिनिधी)
साप्ताहिकांच्या संपादक, पत्रकारांच्या हितासाठी व त्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी बहुभाषिक साप्ताहिक संपादक, पत्रकार संघाची स्थापना करण्यात आली. साप्ताहिक वर्तमानपत्रे चालवितांना येणार्या अडचणींचा सामना करण्यासाठी व भविष्यातील साप्ताहिकांपुढील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी या पत्रकार संघाची स्थापना करण्यात आली. त्यानुसार पत्रकार संघाची पहिली बैठक काल दि.11 फेब्रुवारी रोजी मुख्य कार्यालय धोंडीपुरा, बीड येथे संपन्न झाली. या बैठकीत प्रदेश कार्यकारिणी निवडण्यात आली. यामध्ये प्रदेशाध्यक्षपदी सा.लोकमित्रचे संपादक शेख ताहेर जाफर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तर प्रदेशउपाध्यक्षपदी सा.प्रकाश आधारचे संपादक सुनिल ज्ञानोबा पोपळे यांची निवड करण्यात आली. यावेळी मराठवाडा उपाध्यक्षपदी सा.पोलखोलचे संपादक नितेश राजमल उपाध्ये, सा.रायमोहा परिसरचे संपादक राम काशिद यांची एकमताने निवड करण्यात आली. तर सा.गेवराई संघर्षयोध्दाचे संपादक अमोल कापसे यांची बीड जिल्हाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. यावेळी बोलतांना शेख ताहेर म्हणाले की, आजच्या डिजीटल युगात लोकशाहीचा चौथा स्तंभाला तग धरणे अवघड झाले आहे. यातही साप्ताहिक चालविणे सुध्दा आज जिकरीचे काम झाले आहे. रोज नवनवीन आव्हाने असतांना साप्ताहिकांना आपले अस्तित्व टिकविण्यासाठी प्रचंड धावपळ करावी लागत आहेत. यामध्ये शासकीय स्तरावर काही अडचणी निर्माण होत असतील त्यांना पुर्ण सहकार्य करू असे आश्वासन दिले. तर शासन दरबारी साप्ताहिकांच्या प्रश्नांना वाचा फोडू असे प्रतिपादन सुनिल पोपळे यांनी केले. सदरील पदाधिकार्यांच्या निवडीबद्दल सर्वच स्तरांतुन अभिनंदन होत आहे तर अनेकांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी सा.लोकनाथचे संपादक शेख अब्दुल रहेमान यांनी आभार मानुन बैठकीची सांगता झाली.