गेवराई (प्रतिनिधी) मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, र. भ. अट्टल महाविद्यालयामध्ये गुरुवार दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी प्राचार्य प्रोफेसर रजनी शिखरे यांच्या मार्गदर्शनाखाली पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर मेळाव्याचे अध्यक्षस्थान प्राणिशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मीना नागवंशी यांनी भूषविले तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून देशपांडे फाउंडेशन हुबळी येथील रूपाली वडनेरे यांची प्रमुख उपस्थिती होती. रूपाली वडनेरे यांनी पाल्याचा व्यक्तिमत्व विकासामध्ये महाविद्यालय व पालकांची असलेली महत्त्वाची भूमिका सोदाहरण विशद केली. अध्यक्षीय समारोप प्रसंगी डॉ. मीना नागवंशी यांनी महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेले अभ्यासक्रम व विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. पालकांनी आपल्या इच्छा व अपेक्षा पाल्यांवर न लादता त्यांच्या आवडीनुसार त्यांना करियर क्षेत्र निवडीचे स्वातंत्र देण्याचे आवाहन केले. याप्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक डॉ.अमोल शिरसाट यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. हनुमंत हेळंबे यांनी केले तर आभार डॉ. वर्षा जयसिंगपुरे यांनी मानले. याप्रसंगी पालकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. पालक मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी डॉ. सिद्धेश्वर सटाले व डॉ. प्रदीप दहिंडे यांनी परिश्रम घेतले.
Home Uncategorized पाल्यांच्या जडणघडणीमध्ये महाविद्यालयासोबतच पालकांची भूमिका महत्त्वाची – रूपाली वडनेरे