माजलगाव :
दि.31 जानेवारीच्या पहाटे एक वाजण्याच्या सुमारास गोदावरी नदीवरील पुलावर शिवार सादोळा येथे नांदेडकडे विजय युवराज पगारे (वय 37), महेश रावसाहेब ढोकचोळे (वय33 रा.रांजणखोल) मोटारसायकल (क्र.एम.एच.17-सी.डब्ल्यू-3209) याला पाठीमागून ट्रॅक्टर (क्र.एम.एच.23-टी-5428)च्या चालकाने पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत वरील दोन तरूण जागीच ठार झाले. या ठिकाणाहून ट्रॅक्टर चालक पळून गेल्याचे बोलले जात आहे. सदरील याची माहिती पोलिसांना कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून त्या दोन्ही मयतावर माजलगाव शासकीय रूग्णालयात शवविच्छेदन केले. सदरील ट्रॅक्टर चालकाविरूध्द कलम 304(अ),279 भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील या प्रकरणाचा तपास एपीआय विजयसिंग जोनवाल करीत आहेत.