उपक्रम : उपस्थित राहण्याचे संयोजन समितीचे आवाहन
बीड / प्रतिनिधी
बीड पत्रकार संघाकडून मूकनायक दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम बीड शहरातील सावंत प्लाझा, मित्र नगर चौक शिवाजी नगर येथे असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे मान्यताप्राप्त सम्राट प्रतिष्ठान संचलित छत्रपती राजर्षी शाहू महाराज स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र येथे बुधवार (दि.३१) जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या मूकनायक कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन बीड पत्रकार संघाकडून करण्यात आले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरु केलेल्या मूकनायक वृत्तपत्रास १०४ वर्ष होत आहेत. त्या अनुषंगाणे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मूकनायक दिनानिमित्त मूकनायक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थित संपन्न होतो आहे. या मूकनायक कार्यक्रमास सर्व क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आवाहन. बीड पत्रकार संघाकडून करण्यात आले आहे.