गेवराई, (प्रतिनिधी) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगरच्या विद्यापीठ क्रीडा महोत्सव स्पर्धेत कबड्डीमध्ये आकाश राठोड आणि फुटबॉलमध्ये साक्षी बने या र. भ. अट्टल महाविद्यालयाच्या दोन खेळाडूंची निवड झाली आहे.
अट्टल महाविद्यालयाच्या वरिष्ठ क्रीडा विभाग प्रमुख डॉ. राणी पवार व प्रा. रवींद्र खरात यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. आकाश राठोड व साक्षी बने यांचे ३ ते ७ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजी विद्यापीठ, लोणारे, जि. रायगड येथे होणाऱ्या २५ व्या आंतर विद्यापीठ राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव स्पर्धेसाठी विद्यापीठाच्या फुटबॉल व कबड्डी संघात निवड झाल्याबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अमरसिह पंडित, महाविद्यालय विकास समितीचे सर्व सदस्य, प्राचार्य डॉ. रजनी शिखरे, उपप्राचार्य डॉ. विजय सांगळे, डॉ. प्रशांत पांगरीकर, वरिष्ठ महाविद्यालयाच्या क्रीडा विभाग प्रमुख डॉ. राणी पवार, प्रा. भराडे, प्रा. रवींद्र खरात तसेच प्रा. अभिजीत तौर आदींनी खेळाडूंचे अभिनंदन केले.