मराठी भाषेच्या संवर्धनासाठी व्यवहारातील मराठी शिकणे गरजेचे : प्रकाश भुते

0
204

गेवराई (प्रतिनिधी)-येथील न्यायालयात मा.अध्यक्ष,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड,मा.उच्च न्यायालय, मुंबई,व मा.जिल्हा न्यायालय,बीड यांनी दिलेल्या सूचनेनुसार मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.प्रमुख अतिथी म्हणून येथील ख्यातनाम साहित्यिक श्री.प्रकाश भुते उपस्थित होते.न्यायाधीश श्री.वानखेडे व सर्व न्यायाधीश यांच्या उपस्थितीत श्री.प्रकाश भुते यांनी मराठी भाषेविषयी आपले मनोगत व्यक्त केले.ते म्हणाले, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे,कारण मराठी भाषा अडीच हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात होती,त्याचे पुरावे संशोधकांनी दिले आहेत,आज मराठीला मराठी माणूसच कमी लेखतो आहे,मुले मोबाईलच्या खेळात रमलेली असतात, त्याऐवजी मुलांना मराठी शब्दकोडी सोडवायचा नाद लावा,ही शिक्षक व पालक दोघांचीही जबाबदारी आहे.
न्यायाधीश श्री.वानखेडे यांनी न्यायालयात येणारे सर्व ग्रामीण भागातील मंडळी येतात,न्यायालयाचे कामकाज मराठीतून करण्याचा शासन निर्णय झालेला आहे.त्याची माहिती दिली.
तालुका विधी प्राधिकरण अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी न्यायमूर्ती श्री.मराठे, श्री.रणदिवे, श्री.कुलकर्णी, श्री.जाधव ,वकिल मंडळी,अशिल मंडळी, बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री.सतीषराव म्हेत्रे, श्री.विक्रम जोशी,अन्य संबंधित सर्व टीमने, विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.श्रीकांत जोशी स.अधिक्षक यांनी केले.शेवटी आभार श्री जोशी यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here