जालना (प्रतिनिधी)
केंद्र सरकार वृत्तपत्रां साठी नियतकालिक कायदा 2023 (प्रेस आणि नोंदणी ) मंजूर करणार आहे यातील जाचक अटी रद्द करण्यात याव्यात अशी मागणी असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रदीप कुलकर्णी यांनी जालना येथे बोलताना केली आहे.
दिनांक 28 जानेवारी 2024 रोजी जालना येथील शासकीय विश्रामगृह येथे असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची बैठक राज्याचे अध्यक्ष प्रदीप कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीचे प्रास्ताविक राज्याचे उपाध्यक्ष भिकाभाऊ चौधरी यांनी केले.
मान्यवरांचे स्वागत जालना जिल्हा अध्यक्ष अमित कुलकर्णी व राज्य उपाध्यक्ष ओ के शिंदे यांनी केले.
या कायद्याबाबत सविस्तर माहिती देताना राज्याध्यक्ष प्रदीप कुलकर्णी यांनी हा कायदा वृत्तपत्रांसाठी कसा चांगला आहे आणि कसा जाचक आहे हे देखील समजावून सांगितले. आणि पुढे ते म्हणाले की केंद्र सरकार वृत्तपत्रासाठी चा भारतीय प्रेस कायदा 1867 रद्द करून भारतीय प्रेस 2023 हा कायदा अमलात आणत आहे या कायद्यान्वये अनेक बदल 1867 च्या कायद्यात बदल करून नव्याने हा कायदा अस्तित्वात येत आहे. या कायद्यात वृत्तपत्रांसाठी काही जाचक अटी व जास्तीच्या दंडाची आकारणी करण्याबाबत प्रस्तावित करण्यात आलेले आहे. वृत्तपत्र व्यवसाय हा आधीच तोट्यात आणि डबघाईला आलेला असताना छोट्या वृत्तपत्रांना आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागतो . आणि या संघर्षात छोट्या वृत्तपत्रांची बाजू मांडणारा किंवा त्यांच्या समस्या समजून घेणारा आणि त्यांच्यासाठी योग्य असाच कायदा अस्तित्वात यायला हवा. तेव्हा येऊ घातलेल्या कायद्यात छोट्या आणि मध्यम वृत्तपत्रांसाठीच्या जाचक अटी रद्द करण्यात याव्यात अशी मागणी शेवटी बोलताना राज्य अध्यक्ष प्रदीप कुलकर्णी यांनी केली.
या बैठकीत शासनमान्य यादीवरील छोट्या वृत्तपत्रांच्या जाहिरात दरात शंभर टक्के वाढ करण्यात यावी ज्या दर्शनी जाहिरात वारंवार प्रकाशित करण्यात येतात त्या सर्व जाहिराती साप्ताहिक वृत्तपत्रांना दिल्या जाव्यात त्याचप्रमाणे राज्य शासनाच्या विविध विकास योजना आणि त्या अनुषंगाने प्रकाशित होणाऱ्या दर्शनी जाहिराती ज्या आगामी निवडणुकीपूर्वी दिल्या जाणार आहेत त्या सर्व जाहिराती शासनमान्य यादीवरील साप्ताहिकांना देण्यात याव्यात सन्मान योजनेत ज्यांनी अर्ज केले आहेत त्यांचे अर्ज त्वरित मंजूर करून त्यांना सन्मान योजनेचा लाभ द्यावा. शासनमान्य यादीवरील वृत्तपत्रांना नियमित दिलेल्या जाणाऱ्या जाहिरातीचा आकार 400 चौरस सेंटीमीटर ऐवजी एक हजार चौरस सेंटीमीटर करण्यात यावा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जाहिराती या शासनाच्या जाहिरात धोरण 2018 प्रमाणे सर्व साप्ताहिकांना मिळायला हव्यात त्या दिल्या जात नाहीत याबाबत शासनाने वेगळा आदेश काढावा. या सह काही महत्त्वपूर्ण ठराव या बैठकीत करण्यात आले.
या बैठकीत नवीन राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात आली तसेच विभागीय अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष घोषित करण्यात येऊन त्यांना नियुक्ती पत्राचे वाटप राज्याध्यक्ष प्रदीप कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर संघटनेच्या बाबतीत तातडीने व महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी एक सात सदस्यिय वेगळी कोअर कमिटी जाहीर केली.
बैठकीच्या प्रारंभी राज्याचे उपाध्यक्ष ओम प्रकाश शिंदे यांच्या पत्नीचे नुकतेच दुःखद निधन झाले त्याबद्दल त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्याच बरोबर अजित पाटील यांचे चुलत बंधू यांचेही निधन झाल्याची बातमी मिळाली त्यामुळे त्यांनाही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
आपल्या संघटनेच्या कर्नाटक राज्य अध्यक्षपदी तारिका बेलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करणारा ठराव देखील या बैठकीत सर्वानुमते संमत करण्यात आला त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस सर्वांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.
या बैठकीस भगवानराव शहाणे, ओम प्रकाश शिंदे, प्रचंड सोळंके, रासवे, मधुकर वारे, परमेश्वर सोळंके, दिगंबर सोळंके, सुनील पोपळे, प्रल्हाद शिंदे , अमित कुलकर्णी, सौ मंगल हिवाळे, सौ आनंदी कुलकर्णी, भार्गव हावरगावकर, बाळासाहेब सोळंके यांच्यासह जालना , छत्रपती संभाजी नगर आणि बीड येथील अनेक मान्यवर संपादक संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
राष्ट्रीय सचिव प्रवीण पाटील हे काही अडचणीमुळे या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत परंतु त्यांनी बैठकीचे कामकाज संपल्यानंतर संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रदीप कुलकर्णी यांच्याशी मोबाईल वरून संपर्क साधून बैठकीची व्यवस्थित माहिती घेतली आणि नवीन जाहीर केलेल्या कार्यकारीणी चे त्यांनी अभिनंदन केले.
बैठक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.