लोंबकळत असणाऱ्या विद्युत तारा ताणण्याकडे विद्युत विभागाने लक्ष द्यावे : महेश साळुंके

0
80

गेवराई (प्रतिनिधी) संजय नगर भागात विद्युत तारा जमिनीलगत लोंबकळत आहेत. विजेच्या तारा ताणण्याकडे महावितरणचे दुर्लक्ष होत आहे. दुरुस्तीची कामे अनेक दिवसांपासून रखडलेली आहेत. दुरुस्तीची मागणी केली जात आहेत, तरी याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने धोका वाढत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.
महावितरण कंपनीच्या दुर्लक्षित कारभारामुळे विद्युत तारा अवघ्या सात आठ फुटावर लोंबकळत आहेत विद्युत तारा एकमेकांना चिटकून त्याच्या ठिणग्या रस्त्यावर पडतात आणि विद्युत तारा खाली पडण्याची भीती वाटते. दुर्लक्षित असलेल्या विद्युत खांब पूर्णपणे काही ठिकाणी वाकलेले आहेत. तसेच ह्या लोंबकळत असणाऱ्या तारी तात्काळ ताणण्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी संजय नगर येथील रहिवाशी महेश साळुंके यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here