नवी दिल्लीत कर्तव्य पथावर आज नाभिक समाजाचा होणार सन्मान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सात नाभिक दाम्पत्य निमंत्रण

0
1217

मुंबई : संजय पंडित

नवी दिल्ली येथील कर्तव्य पथावर साजऱ्या होणाऱ्या भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यास विशेष अतिथी म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाभिक समाजाच्या सात दाम्पत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनी अशा प्रकारचा बहुमान म्हणजे नाभिक समाजाच्या सलून व्यवसायाचा सन्मान असल्याच्या भावना समाजातील कुटुंबीयांनी व्यक्त केल्या आहेत.या निमंत्रणामुळे सात दाम्पत्यांचे सहकारी,नातेवाईक आणि जिल्ह्यासह राज्यातील नाभिक समाजामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
केंद्र शासनाने देश भरातून एकूण नाभिक समाजातील सात बांधवांची त्यांच्या जोडीदारासह निवड केली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाभिक समाज वर्षानुवर्षे आपला पारंपरिक सलून व्यवसाय मोठ्या प्रमाणात करीत आहे.प्रजासत्ताक दिनी नाभिक समाजातील सलून व्यवसायिक दाम्पत्यांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करून सरकारने एकप्रकारे नाभिक समाजाच्या सलून व्यवसायाचा सन्मान केला आहे,असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.या सात निमंत्रित दाम्पत्यात जगदीश वालावलकर,विजय शिवा चव्हाण, विजयालक्ष्मी विजय चव्हाण,परेश प्रभाकर चव्हाण, पूर्वा परेश चव्हाण,रवींद्र चव्हाण,रुपेश पिंगुळकर,रुपाली पिंगुळकर,आकाश पींगुळकर,सिद्धेश पिंगुळकर आदी समाज बांधव दिल्लीला रवाना झाले आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाभिक समाज अध्यक्ष जगदीश चव्हाण यांनी विश्वकर्मा कौशल्य विकास योजने अंतर्गत यासाठी विशेष मेहनत घेऊन योग्य तो पाठपुरावा केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here