हॉटेल किनाराच्या माध्यमातून गेवराईकरांना मिळणार स्वादिष्ट जेवण-शिवराज पवार

0
559

गेवराई (शुभम घोडके) शहरातील शाहू नगरी परिसरात हॉटेल व्यवसायिक पांडुरंग जवंजाळ त्यांनी सुरू केलेल्या हॉटेल किनाराच्या माध्यमातून गेवराई शहराच्या व्यावसायिक क्षेत्रांमध्ये भर पडल्याचे प्रतिपादन युवा नेते शिवराज पवार यांनी केले आहे. हॉटेल किनारा चे उद्घाटन 13 जानेवारी रोजी शिवराज पवार यांच्या शुभहस्ते मोठ्या थाटामाटात संपन्न झाले .यावेळी तरुणांनी राजकारणात सोबत उद्योग व्यवसायात लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि आपल्या आवडत्या व्यवसायातून प्रगती साधावे व इतरांना रोजगारांची संधी उपलब्ध करून द्यावी असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले विशेष म्हणजे अनेक मान्यवरांनी शुभेच्छा देखील दिल्या हॉटेल किनारा व्हेज नॉन -व्हेज तसेच चविष्ट पदार्थाची रेलचेल असणार आहे महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी लोकांसाठी पार्टीसाठी सुविधा उपलब्ध आहे हॉटेल किनारा चिकन मटन आणि बिर्याणी व्हेज नॉनव्हेज तसेच दार आणि स्वादिष्ट जेवणाचा स्वाद घेता येणार आहे तसेच या उद्घाटन प्रसंगी माजी नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, माजी नगरसेवक भरत गायकवाड, पांडू शेठ जवंजाळ,सुमित जवंजाळ,अनिल सूर्यवंशी,राम लिंबोरे यांची उपस्थिती होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here