गेवराई (प्रतिनिधी) गेवराई शहरात सध्या कर वसुली मोहीम न.प.ची चालू असून ज्या नागरिकांनी आपल्याकडील कराचा भरणा केला नाही अशा नागरिकांचे नळ कनेक्शन कट केले जाणार असल्याची माहिती नगरपरिषद चे सीईओ भोसले यांनी दिली आहे.
गेवराई शहरातील ज्या नागरिकांनी आजवर घरपट्टी, नळपट्टी व विविध अशा करांचा भरणार नगरपरिषदला केलेला नाही अशा थकबाकीदाराकून नगरपरिषदने वसुली मोहीम चालू केली असून, या मोहिमेमध्ये ज्या नागरिकांनी रहिवाशांनी गेवराई शहरातील आपल्याकडील कराचा भरणा किंवा थकबाकी भरली नाही अशा लोकांचे नळ कनेक्शन कट करण्याची मोहीम नगर परिषेदकडून राबवली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी कराचा भरणा करून नगरपालिकाला सहकार्य करावे असे आव्हान नगरपरिषदचे सीओ विशाल भोसले यांनी केले असून नागरिकांनी त्यांच्या आव्हानाला साथ देत आपल्याकडील कराचा भरणा करावा व नगरपरिषद ला सहकार्य करावे.
पथक प्रमुख पदी एकनाथ लाड यांची निवड
नगरपरिषदेच्या वतीने नागरिकांकडील थकबाकी वसुली साठी एका पथकाची नेमणूक करण्यात आलेली आहे. जो थकबाकीदार थकबाकी देणार नाही त्याचे नळ कनेक्शन या पथका मार्फत कट केले जाणार असून, या पथक प्रमुख पदी एकनाथ लाड पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख यांची निवड सिओ विशाल भोसले यांनी केले आहे.