गेवराई ( प्रतिनिधी )
गोदाकाठच्या गावात अवैध वाळू उत्खनन सुरुच.अवैध वाळू वाहतुक व उत्खनाने आता पर्यंत अनेक जीव घेतले आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासनास जाग येणार
सावळेश्वर, म्हाळस पिंपळगाव हद्दीतील गोदापात्रात काल दि.१० रोजी रात्री केन्हीवर काम करणारा नबी हबीब शेख वय २५ रा.हादगाव ता अंबड जि.जालना मजूर पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.या घटणे संदर्भात अधिक माहिती अशी की तालुक्यातील सावळेश्वर व म्हाळस पिंपळगाव हद्दीतील गोदापात्रात अवैध वाळू उत्खनन सुरू होते कैनीच्या सहाय्याने अवैध उत्खनन केले जात होते कैनीवर काम करणारा मंजुर कैनीची दोरी तुटल्याने गोदापात्रातील पाण्यात जावून रस्सी पाहण्यासाठी गेला होता परंतु तो बराच वेळ होवून ही पाण्याच्या बाहेर परतला नसल्याने त्यांच्या सहकाऱ्यांनी ताचा शोध घेणास सुरुवात केली बराच वेळ शोध घेऊनही सापडला नसल्याने
आरडाओरड सुरू केली परंतु त्या मजुराचा शोध लागला नाही काल सायंकाळच्या सुमारास तो मंजूर पाण्यात बुडाला असुन अद्याप ही त्याचा शोध लागलेला दुपार पर्यंत शोध सुरच होता.तो मजूर नेमका कोणाच्या कैनी वर काम करत होता व त्याचे नाव समजु शकले नाही प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी आले असून त्याचा शोध सुरू आहे
चौकट
करिश्मा नायर यांनी कारवाई करुनही अवैध वाळू वाहतूक सुरुच
काल दि.१० रोजी अप्पर जिल्हाधिकारी करिष्मा नायर यांनी अवैध वाहतूक करणारे पाच हायवा वर कारवाई करत जवळपास अंदाजे २ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता परंतु नायर यांनी कारवाई करुनही वाळू माफियांना कसल्याही प्रकारची धास्ती बसली नाही
गेवराई चे तहसिलदार नेमकं करतात काय..?
गेवराई तालुक्यात बेसुमार अवैध वाळू उत्खनन केले जाते अवैध पणे वाळू ची वाहतूक होते तरीही गेवराई चे तहसिलदार खोमणे शांत का?
गेवराई मध्ये रुजू झाल्या पासुन तहसीलदार साहेबांनी बोटांवर मोजता येतील येवढ्याच कारवाया केल्यात आणखी किती बळी गेल्यानंतर आपण कारवाई करणार असा प्रश्न आता गोदाकाटचे नागरिक विचारत आहेत.
मंडळअधिकारी आणि तलाठी फक्त नावालाच…
मंडळ अधिकारी आणि तलाठी आपल्या सज्जात हद्दीत अवैध वाळू उत्खनन होत आहे हे तुम्हाला माहिती नव्हते का ?
की जानुन बुजून आपण होत असलेल्या अवैध वाळू उत्खना कडे दूरलक्ष करत होतात.
तलाठी किरण दांडगे आणि मंडळ अधिकारी आंधळे आपण फक्त नावालाच आहेत की काय
कि आंधळे पाहुणही आंधळे का?