अमृतसर प्रतिनिधी महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या अभ्यास गटाच्या सदस्यांचा पंजाब मधील संत शिरोमणी सेनाजी महाराज( भगतसिंग सैनजी बाबा) यांच्या मूळ गावी सोहेल ठठ्ठी जिल्हा तरणतारण या ठिकाणी जाऊन संत शिरोमणी सेनाजी महाराज यांच्या विषयी संपूर्ण माहिती घेतली व तिथे असलेल्या सात एकर गुरुद्वारा कंसात मंदिर यांचे दर्शन घेऊन त्यांच्या जीवनावरील सर्व माहिती घेऊन त्यांचे 21 वे वंशज यांची भेट घेऊन त्यांच्याबरोबर विविध विषयावर चर्चा केली ढपाई येथील ढपाई येथील 21 वंशज यांच्याकडे भगत सैन महराज यांचे हस्तलिखित ग्रंथ व ताम्र पत्र व इतर साहित्याची पाहणी केली या अभ्यास दौऱ्या त महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे सरचिटणीस दिलीपजी अनर्थे मराठवाडा विभागीय अध्यक्ष विष्णुजी वखरे ज्येष्ठ सल्लागार लक्ष्मण धाकतोडे संभाजीनगर जिल्हाध्यक्ष सुधाकरराव आहेर कर्मचारी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब जगताप प्रदेश संघटक तथा नाभिक वार्ता संपादक सुनील पोपळे हे उपस्थित होते या अभ्यास गटाने 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर पर्यंत पंजाब मधील सैनजी महाराज यांच्या विविध गुरुद्वारांना भेटी देऊन त्यांच्या वंशज डॉक्टर संतोष सिंग सैन अमृतसिंग सेन जसविंदरजी खामरा जालंदर आदी मंडळींनी या अभ्यास गटातील सदस्यांचा स्वागत व सन्मान केला
Home Uncategorized महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या अभ्यास गटाच्या सदस्यांचे पंजाबमध्ये विविध ठिकाणी भेटी