गेवराई : प्रतिनिधी
आर्थिक व्यवहारात अडचणीत आलेल्या काही पतसंस्था व मल्टीस्टेट को.ऑप क्रेडिट सोसायट्या मुळे, सहकार क्षेत्रातील सर्वच संस्थेकडे संशयाने पाहिले गेल्याने , चांगला कारभार करणाऱ्या संस्थाही अडचणीत आल्या. दरम्यान, सहकार क्षेत्र टिकले पाहिजे आणि संस्थेवरचा संशय दूर झाला पाहिजे. या हेतून, सर्व बाजुनी प्रयत्न झाल्याने, वातावरण स्थिर होऊ लागले असतानाच, हेतूपुरस्सर काहीजणांनी संशय निर्माण करण्याचे धोरण सुरू केले असून, हा “ब्लॅकमेल” करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा होऊ लागली आहे. दरम्यान, वृत्तपत्रात अनेक
संस्थेची नावे, दुसर्या दिवशी गायब होत असल्याचे दिसून आल्याने, संशय बळावला आहे. सर्व संस्था सुरळीत सुरू असून, ग्राहक व ठेवीदारांनी विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
बीड जिल्ह्य़ातील बॅन्कींग क्षेत्रातील सहकारी पतसंस्था व मल्टीस्टेट को.ऑप क्रेडिट सोसायट्या आर्थिक अडचणीत आल्याने, गेल्या दोन महिन्यांपासून ग्राहक, ठेवीदार व बाजारपेठेत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, संस्था चालकांनी पुढे येऊन खुलासा केल्याने , ग्राहक व ठेवीदारांनी विश्वास ठेवल्याने, बाजारपेठेत स्थिरता येत असून, व्यवहार सुरळीत होऊ लागले आहेत. दरम्यान, ग्राहक आणि ठेवीदारांमध्ये, पून्हा एकदा संशय निर्माण करण्याचे काम, काहींनी सुरू केले असल्याने, या मागे त्यांचा नेमका हेतू काय ? हा तर ब्लॅकमेलचा प्रकार तर नाही ना ? अशी चर्चा आता होऊ लागली आहे.
सहकारी पतसंस्था, मल्टीस्टेट को.ऑप क्रेडिट सोसायट्यांचा कारभार स्थिर होऊ लागला असून, ग्राहक, ठेवीदार, सुज्ञ नागरिक, बांधिलकी जोपासून कार्यरत असलेल्या सामाजिक संसंथेचे पदाधिकाऱ्यांसह, नागरिकांनी
विश्वास ठेवल्याचे असल्याचे चित्र आहे. ठेवी काढून घेण्यासाठी होणारी गर्दी ओसरली आहे. सहकार क्षेत्र टिकले पाहिजे. प्रमाणीकपणे काम करणाऱ्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतल्याने सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. सहकार क्षेत्रातील विश्वासाला तडा जाणार नाही. याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे. काही सहकारी पत संस्था, मल्टीस्टेटच्या कार्यालयाला टाळे लागल्याने, ग्राहकांनी ठेवी काढण्यासाठी गर्दी केली होती. याचा फटका गेवराई तालुक्यातील मल्टीस्टेट को.ऑप क्रेडिट सो. व नागरी सहकारी पतसंस्थेला बसला. विशेष म्हणजे, साठ-सत्तर टक्के कर्ज वाटप करण्यात आलेल्या संस्थेला एकाच वेळेस ठेवी देणे जड गेले आहे. तरीही, ठेवी देण्यात आल्यात. मात्र, दिलेले कर्ज एका दिवसात येणे शक्य नाही. त्याच बरोबर, ते नियमाला धरून होणार नाही. ही मोठी अडचण समजून घेणे गरजेचे असल्याचे संस्थाचालकांना वाटते. वास्तविक, ठेवी सुरक्षित असून, जिल्ह्यात पसरलेल्या अफवांमुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ठेवीदारांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता, सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले होते. काहीजण जाणीवपूर्वक, हेतूपुरस्सर गैरसमज पसरवून, पून्हा एकदा संस्थेविषयी संभ्रम निर्माण करीत असल्याचे चित्र रंगवले जात आहे. यामागे वेगळाच हेतू ठेवून, मॅसेज दिला जात असल्याचे उघड होत असून, काही वृत्तपत्रात पहिल्या दिवशी आलेल्या संस्थेचे नाव दुसर्या दिवशी गायब होत असल्याने, सशंय बळावला आहे.