गेवराई :
महाराष्ट्र स्टेट को. ऑप. हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लि, मुंबई या संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत चौथ्यांदा जयसिंग शिवाजीराव पंडित यांची बिनविरोध संचालक म्हणून निवड झाली आहे. सन २००५ पासून ते या संस्थेच्या संचालक मंडळात कार्यरत आहेत. जयसिंग पंडित यांच्या अविरोध निवडीमुळे सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
दि महाराष्ट्र स्टेट को. ऑप. हाऊसिंग फायनान्सकॉर्पोरेशन लि, मुंबई या संस्थेच्या सन २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर झाला होता. दि. २० नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. बुधवार, दि. १३ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मराठवाडा विभागातून जयसिंग पंडित (बीड) यांच्यासह विद्यमान उपाध्यक्ष सुनिलराव जाधव (छत्रपती संभाजीनगर), हरिहरराव भोसीकर (नांदेड), दिलीपराव चव्हाण (हिंगोली) व रविंद्र पतंगे मुख (परभणी) या पाच उमेदवारांचे पाच जागांसाठी अर्ज शिल्लक राहिल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहिर करण्यात आले. शिवशारदा मल्टिस्टेटचे संस्थापक अध्यक्ष जयसिंग पंडित यांची चौथ्यांदा दि महाराष्ट्र स्टेट को. ऑप. हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाल्यानंतर अनेकांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांचे दुरध्वनीवरून अभिनंदन केले. दि महाराष्ट्र स्टेट को. ऑप. हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लि, मुंबई या संस्थेच्या एकुण २५ संचालकांच्या जागांसाठी दि. २० नोव्हेंबर पासून निवडणुक प्रक्रिया सुरु झाली होती. मराठवाडा विभागातील पाच संचालकांच्या बिनविरोध निवडीनंतर उर्वरित जागांची निवडणुक प्रक्रिया सुरु असून निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून राजेंद्र विर काम पाहत आहेत. जयसिंग पंडित यांच्यासह मराठवाडा विभागातून बिनविरोध निवड झालेल्या सर्व संचालकांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.