आष्टी प्रतिनिधी
मनसे युवानेते कैलास दरेकर यांच्या प्रेरणेतून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आष्टी आणि जगदंबा तरुण मंडळ,सायकल गल्ली,आष्टी. जिल्हा बीड.यांच्यावतीने दिनांक 22 नोव्हेंबर 2023 रोजी कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन,हरीश हातवटे,नागेश शेलार,महादेव लांडगे,विश्वेश्वर बोडखे,राजेंद्र लाड यांच्या उपस्थितीत दीपोत्सव काव्यसंध्या संपन्न झाली.यावेळी रांगोळी स्पर्धेतील सर्व यशस्वी स्पर्धकांना स्मृतीचिन्ह आणि रोख रक्कम,शिवाय प्रथम आलेल्या वैष्णवी वराट,सलोनी माने,वैष्णवी दरेकर या स्पर्धकांना सोन्याच्या नथी पाहुण्यांच्या हस्ते बक्षीसाच्या स्वरूपात देण्यात आल्या.रांगोळी स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांना सोन्याची नथ बक्षीस हा आष्टी तालुक्यात सध्या कुतूहलाचा विषय आहे.याबद्दल युवा नेते कैलास दरेकर यांनी राबवलेल्या अभिनव उपक्रमाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.रांगोळी स्पर्धेला सोन्याचे दिस, विजेत्यांना सोन्याची नथ बक्षीस.असेच म्हणावे लागेल.यावेळी सोपान मोरे,बाबासाहेब दिंडे,संजय फरताडे,तुषार चव्हाण,सुनील पाचपुते,भरत चव्हाण,मच्छिंद्र गरजे,सतीश शिंदे उपस्थित होते.