गेवराई प्रतिनिधी
येथील मन्यारवाडी रोड गेवराई बायपास लगत 2014 साली गुरुकुल इंग्लिश स्कूलची स्थापना करण्यात आली होती आज तागायत दहा वर्ष यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत स्कूलच्या प्राचार्य सौ.अरुणा ठाकर व संस्थापक अध्यक्ष प्रा. मोहन ठाकर या दांपत्याने विद्यार्थ्यावर घेतलेल्या मेहनतीमुळे पालकांचा विश्वास संपादन केला पालकांच्या मागणीवरून कनिष्ठ महाविद्यालयाची संकल्पना समोर आली महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी लागणाऱ्या सोयी सुविधा उपलब्ध करून देताना त्या सोयी सुविधांचा उपयोग माध्यमिक स्तरावर होईल विषयात पारंगत असलेले तज्ञ प्राध्यापक माध्यमिक स्तरावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी उपलब्ध असतील या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगामध्ये आयआयटी.मेडिकल .इंजिनिअरिंग .स्पर्धा परीक्षा. या स्तरावर विद्यार्थ्यांना उपयोग होईल महाविद्यालयाचा परिसर हा शालेय परिसर असल्यामुळे विद्यार्थिनींसाठी अगदी सुरक्षित असेल गुरुकुलच्या प्रांगणात आल्यावर विद्यार्थिनींची सर्वस्वी जबाबदारी ही महाविद्यालयाची असेल पालक अगदी निर्दास्त राहू शकतात असे अनेक स्वप्ने विद्यार्थ्यांसाठी घेऊन महाविद्यालयाची स्थापना आम्ही करत आहोत.