जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांना कवी सय्यद अल्लाउद्दीन यांचा कवितासंग्रह भेट

0
508

आष्टी प्रतिनिधी                                

आष्टी येथील प्रसिद्ध कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांच्या झिंदाबाद…मुर्दाबाद कवितासंग्रहाची रोप्य महोत्सवी तिसरी आवृत्ती बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांना सप्रेम भेट देण्यात आली. 71 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, परळी वैजनाथ येथे दिलजान प्रकाशन कडून प्रकाशित पुस्तकाला 25 वर्ष पूर्ण झाले आहेत.यातील अनेक कविता विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झाल्या आहेत.या कवितासंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांचा कुसुमाग्रज पुरस्कार प्राप्त झालेला आहे.शिवाय अनेक पुरस्काराने सन्मानित केले आहे.पुस्तकाला ज्ञानपीठ विजेते ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज आणि बंगाली लेखक,अभिनेता गिरीश कर्नाड यांच्या शुभेच्छा लाभलेल्या असून राम शेवाळकर,डॉ.सुधीर रसाळ,डॉ.यु.म.पठाण,डॉ.सुहासिनी इर्लेकर, डॉ.प्रकाश मेदककर,प्रा.फ.मुं.शिंदे,महावीर जोंधळे,रामदास फुटाणे,अशोक नायगावकर,महेश केळुसकर,प्रा.दत्ता भगत, जीवन किर्लोस्कर,प्रा.अनंत हंबर्डे,दया पवार यांची पाठराखण लाभली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here