सुशी येथे बदलमशहा यांच्या उरुसनिमित्त यात्रा

0
228

गेवराई :
गेवराई तालुक्यातील सुशी (वडगांव) येथे प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतिक असलेल्या हजरत किबला सय्यदशहा बदलमशहा (रहेमतुल्लाह अलईह) दर्गाहच्या उरुस निमित्त बुधवार, दि.१५ नोव्हेंबर रोजी संदल निमीत्त गावातुन बदलमशहा यांची छबीना मिरवणूक तर गुरुवार, दि.१६ व शुक्रवार दि.१७ रोजी दोन दिवसीय उरुस व यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी यात्रेकरूंनी या यात्रोत्सवात बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सुशी येथील संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
आगळा-वेगळा उत्सवात उत्सव म्हणजे उरुस व यात्रोत्सव होय. दिवाळीची अमावस्या होवून जो बुधवार येतो, त्या दिवशी सुशी वडगाव येथे संदल मिरवणूक होऊन यात्रेला प्रारंभ होतो. तर बुधवार, दि.१५ नोव्हेंबर रोजी हजरत किबला सय्यदशहा बदलमशहा (रहेमतुल्लाह अलईह) यांच्या उरूस निमित्त गावातुन हिंदू-मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संदल मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत सुशी येथील गांवकरी तसेच वडगांव, चिखली, सिंदखेड, कवडगांव, बंगालीपिंपळा, कोळगाव, मादळमोहीसह अन्य ठिकाणाहूनही लोक मोठ्या संख्येने सहभागी होतात. तर गुरुवार हा यात्रेचा दुसरा दिवस, म्हणजे बच्चे कंपनीचा मौजमजा करण्याचा दिवस असतो. या ठिकाणी गेवराई, मादळमोही, सिरसदेवी, गढी, उमापूर, सिरसमार्ग येथील कापड दुकानदार, हाॅटेल चालक व खेळण्याचे व्यापारी आवर्जून हजेरी लावून आपपली दुकाने थाटतात. उरुसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मिरवणूक व यात्रोत्सवात यात्रेकरूसह परिसरातील नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजन समिती व सुशी ग्रामस्थांच्या वतिने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here