बीड/प्रतिनिधी
माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी बीड तालुक्यातील गोरक्षनाथ टेकडी आणि बीड शहरातील ग्रामदेवता म्हणून ओळखली जाणारी खंडेश्वरी देवीच्या देवस्थानसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे या दोन्ही देवस्थानच्या विश्वस्त मंडळांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता हा निधी मंजूर झाल्यामुळे देवस्थानच्या विकास कामात भर पडणार आहे
माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे सातत्याने विविध विकास कामांचे प्रस्ताव दाखल करून त्यासाठी मंत्रालयात पाठपुरावा करत असतात त्यापैकीच बीड तालुक्यातील दोन देवस्थान साठी पाच कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे बीड पासून जवळच असलेल्या श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे पदावर असतानाही त्यांनी विविध विकास कामासाठी निधी उपलब्ध करून दिला होता तर गेल्या काही महिन्यात झालेल्या अखंड हरिनाम सप्ताह निमित्त त्यांनी या देवस्थानच्या विकासासाठी आपण प्रयत्न करून निधी मंजूर करून आणू असे आश्वासन दिले होते त्यानंतर यासाठी त्यांनी एक कोटी 64 लाख रुपयांचा प्रस्ताव दाखल केला होता या प्रस्तावात एक कोटी रुपये मंजूर झाले असून बीड शहरातील ग्रामदैवत असलेल्या श्री खंडेश्वरी देवस्थानच्या विकास कामासाठी चार कोटी मंजूर झाले आहेत गोरक्षनाथ टेकडी देवस्थान येथे सभामंडप आणि इतर कामे होणार असून बीड येथील खंडेश्वरी मंदिर परिसरात पर्यटन तीर्थक्षेत्र विकास कामांतर्गत प्रसादालय, सांस्कृतिक सभागृह, भिंत बांधकाम,अंतर्गत बांधकाम, नाली बांधकाम, वाहनतळ, विद्युत तळ,पाणीपुरवठा व स्वच्छतेची कामे, अग्निप्रतिरोधक, आदी विकास कामे केली जाणार आहेत या दोन्ही देवस्थानच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली असून याबाबत निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, देवस्थानच्या विकास कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे ह भ प नवनाथ महाराज ढेकणमोहकर व भक्तगण तसेच खंडेश्वरी ट्रस्टींच्या वतीने जेष्ठ संपादक नामदेवराव क्षीरसागर, राणा चव्हाण,राजेंद्र बनसोडे,सुरेश बनसोडे,सम्राट चव्हाण,राजू लोळगे,बंडू खनाळ, विकास गाडेकर,अंबादास गुरव,किसन चव्हाण,विक्रम चव्हाण यांनी अण्णांचा सत्कार करून आभार व्यक्त केले आहेत
![](https://prakashaadhar.in/wp-content/uploads/2023/11/IMG-20231115-WA0062-1024x681.jpg)